नांदेड| शहरामध्ये घडत असलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्हयावर आळा बसवुन गुन्हे उपडकिस आणण्याकरीता मा पोलीस अधिक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे साहेब, मा अपर पोलीस अधिक्षक श्री. अविनाश कुमार साहेब, व सहायक पोलीस अधीक्षक, उप विभाग नदिड शहर मा. किरितीका मॅडम यांनी दिलेल्या आदेशप्रमाणे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमलदार यांना पोलीस स्टेशन हददीत परिणामकारक पेट्रोलींग चालु ठेवुन गुन्हेगारांचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणण्याकरीता सुचना दिले होते.
सदरील सुचनाप्रमाणे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचारी हे दिनांक. १८/०१/२०२४ रोजी सांयकाळी पो.स्टे हददीत शासकिय वाहनाने रवाना होउन पेद्रोलींग करीत असतांना, रात्री २०.५५ वाजताचे दरम्यान मोर चौकाकडुन ए. के संभाजी मंगल कार्यालयाकडे जात असताना ए.के. मंगल कार्यालयाचे पाटीजवळ सार्वजनीक रोडवर एक सशयीत इसम आपले ताब्यात हिरो स्पलेन्डर मोटार सायकल घेवुन थांबला दिसला व तो पोलीसांना पाहुन पळुन जात असतांना त्यास पाठलाग करून त्यास थांबवुन त्याचे ताब्यातील मोटार सायकलचे कागदपत्राबाबत विचारपूस करता तो कांही माहिती देत नसल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली.
त्यांन त्याने त्याचे नांव अनिल व्यंकटराव शिंदे वय २७ वर्ष रा. कल्याणनगर राजकॉर्नर असे सांगुन त्याचे ताब्यातील मोटार सायकल क. एमएच २२-यू-७७२६ कि.अं. ४०,०००/-हि वजिराबाद येथील तरोडेकर मार्केटजवळुन माहे डिसेंबर महिन्यात चोरल्याचे सांगीतल्याने त्याबाबत खात्री केली असता पो.स्टे वजिराबाद येथुन गुरन ५८८/२०२३ कलम ३७९ भादंवि प्रमाणे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरील आरोपी अनिल व्यंकटराव शिंदे याचेकडे सखोल विचारपुस करता त्यांनी वेगवेगळ्या कपंनीचे इतर दोन चोरीच्या मोटार सायकल १. विना क्रमांकाची हिरो स्पलेन्डर चेसिस क्रमांक MBLHA10ANBHD05527, इंजिन क. HA10EJ0HD09596, कि.अ.४०,०००/- रूपये २. काळ्या रंगाची पल्सर क्रमांक एमएच २६ ओओ/ २७४३ चेसिस क्रमांक MD2DHDHZZRCF81956, इंजिन क. DHGBUE62183 कि.अ. ५०,०००/- रूपये हया फरांदेनगर येथील सार्वजीक रोडवरून काढुन दिल्याने त्याचेकडुन एकुण तिन मोटार सायकल कि.अ. १,३०,०००/- रूपयाचे जप्त केल्या आहेत.
सदरील कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे साहेब, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री अविनाश कुमार साहेब, मा. किरितिका मॅडम सहायक पोलीस अधीक्षक उप विभाग नांदेड शहर व पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलामवाड पो.स्टे भाग्यनगर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रमुख पोउपनि सुनिल अशोक भिसे, पो.हे.कॉ ७०९ दिलीप राठोड, पो.हे. कॉ १०९८ गजानन किडे, पो.हे.कॉ ८१८ प्रदिप गर्दनमारे, कदम, पोशि/७१० ओमप्रकाश कवडे व सायबर सेल येथील पोहेकॉ १२४२ राजेन्द्र सिटीकर यांनी कामगीरी पार पाडली.