श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| श्री गणेशोत्सव तसेच ईद मिलादुन्नबी या देश पातळीवर साजरा होणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर माहूर पोलिसांनी शहरातील मिरवणूक मार्गावरून भर पावसात पथ संचलन केल्याने नागरिकांतून पोलिसांचे अभिनंदन होत असून गणेशोत्सव शांततेत डीजे मुक्त सदभावना धार्मिक सलोखा राखत साजरा करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी केले आहे.

माहूर शहरात 19 ठिकाणी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून, तालुक्यात दीडशेवर श्री गणेश मंडळांनी मोठ्या भक्ती भावात श्री गणेशाची स्थापना करून या ठिकाणी विविध कार्यक्रमासह धार्मिक कार्यक्रम तसेच अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरही घेण्यात आलेली आहेत. श्री गणेशाची स्थापना केल्यानंतर दररोजच पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यक्रमात पावसाचे विघ्न येत असले तरीही गणेशभक्त मोठ्या भक्ती भावाने श्री गणेशाची पूजाअर्चा सह धार्मिक कार्यक्रम घेतच आहेत भर पावसात श्री गणेशाची स्थापना असलेल्या ठिकाणी कुठलेही व्यत्यय येऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक गणेश कराड हे स्वतः या ठिकाणी भेटी देत आहेत.

तालुक्यात शांतता राहावी यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कराड हे रात्र दिवस पोलीस स्टेशन हद्दीतील सर्वच गणेश मंडळांना भेटी देत आहेत. या पार्श्वभूमीवर माहूर शहरातून दि 4 रोजी 4 वाजता पथ संंचलन करण्यात आले. यावेळी पाऊस भरपूर पडला तरीही पोलिसांनी पथसंचलन चालू ठेवले संचलन भर पावसात सुरू असल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कर्तव्यप्रती आदर व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड सपोनी शरद घोडके सपोउपनी पालसिंग ब्राह्मण सपोउपनी गणेशअन्येबोईनवाड सपोउपनी बाबू जाधव यांचे सह पोलीस होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.

