अर्थविश्वनांदेड

‍कुटुंर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पीएम रूम कंपाउंड वॉल, वाहन तळाचे काम निकृष्ट दर्जाचे

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। नायगाव तालुक्यातील कुंटूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील पीएम रूमचे,कंपाउंड वॉल, वाहनतळाचे काम शिलकोट मध्ये केले जाते आहे, तसेच दगडाचे डस पावडर, वापरून सदर कामे केल्याने दवाखाना ही गळतीला लागला होता. त्याच प्रमाणे पिएम रुम हि गळेल अशी शंका नागरिकांना येऊ लागले आहे.

66 लाख रुपये मंजूर झालेल्या पीएम रूम व दोन वाहनतळ व कंपाउंड वॉल फेवर ब्लॉक असे काम घेण्यात आले होते. या कामा मध्ये गुत्तेदाराने रेती न वापरता शीलकोट वापरून काम केल्याने भिंतीही शिलकोट मध्येच बनवल्या व त्यावर रेतीने प्लास्टर केले यामुळे सदर बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे होत असून याचा परिणाम काही दिवसातच बघायला मिळेल अशी परिस्थिती कुंटूर येथील कामाची होत आहे. चार कोटी खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम केल्यानंतर ताब्यात घेण्याच्या अगोदरच हा दवाखाना गळायला लागला त्याचप्रमाणे वाहन तळे व पीएम रूमचे चार रूमचे काम मात्र गळायला लागेल व त्यांच्या भिंतीही काही दिवस टिकेल की नाही याचा भरोसा नागरिकांना राहिला नाही.

शिलकोट म्हणजे माती मिश्रित पावडरने बांधकाम केल्याने सदर पाणी चा निचरा होत नाही व पाणी शोषून घेतल्यामुळे पाणी आत मध्ये पाजरतोय त्यामुळे कोणतीही पिलर असो भिंत असो या स्लॅब चे काम हे निकृष्ट होणार असे समीकरण असतानाही काही बुद्धिमान इंजिनियरने सीलकोट वापरल्याने भिंती मजबूत होतात व तसे गोरमेंट परवानगीच दिली आहे .

असे सांगून सदर गुत्तेदारांना शिलकोटच वापरा व चांगले कामे करा असे आदेश दिले असल्याचे गुत्तेदार पवार यांनी सांगितले त्यामुळे शिलकोट काम करून निकृष्ट दर्जाचे कामे करून 66 लाख रुपयांचा निधी अर्ध्या मध्ये काम कसे होईल याकडे गुत्तेदाराचे लक्ष असून चांगले कामे करत नसल्याने कुंटूर मध्ये मात्र निकृष्ट कामाचा पायंडा पडला की काय..?चर्चा होते आहे. सदर कामाची चौकशी इंजिनियर मार्फत करून शिलकोट का वापरले याची तपासणी करण्यात यावी व त्यांची परवाना दिल्या कोणी ती परवानगी दाखवून सदर काम दहा वर्षात जर गळू लागले तर याची भरपाई गुत्तेदाराकडून घेण्यात यावी अशी मागणी ही नागरिकांतून बोलल्या जात आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!