नांदेडलाईफस्टाईल

नळयोजनेचे काम अर्धवट ; हिमायतनगरात भीषण पाणी टंचाई ; पाण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा 

हिमायतनगर, अनिल मादसवार। हिमायतनगर शहराचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडविण्यासाठी 19 कोटींची नळयोजना सण 2018 मध्ये मंजूर करण्यात आली. प्रत्यक्षात कामाला जून 2019 ला सुरुवात झाली, मात्र या कामात ठेकेदार अभियंता यांचा नाकर्तेपणा व प्रशासनाचा दुर्लक्षित कारभार यामुळे ही योजना सपशेल फेल होतांना दिसत आहे. आजपर्यंत गुत्तेदारास 15 कोटी 28 लक्ष रुपये अदा करण्यात आले असून, अजूनही नळयोजनेचे काम अर्धवट आहे, सध्या कडाक्याच्या उन्हात शहरांतील 17 वॉर्डातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते आहे, तर पाणी मिळत नसल्याने शेकडो महिलांनी दि 24 एप्रिल रोजी नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र अजूनही प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळें पाणी मिळाले नाही, त्यामुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख हनिफ सर यांनी आयुक्त तथा संचालक नगरपंचायत प्रशासन संचालनालय मुंबई यांच्यासह जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार, पोलीस प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देऊन पाणी न मिळाल्यास 5 जून पासून बेमुद्दत आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील नगरपंचायत कार्यालय अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम दिनांक 02.07.2019 पासून सुरु करण्यात आले असून, सदरील पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा निधी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नगर पंचायत हिमायतनगर असा तिघांचा मिळून रक्कम 19.19 कोटी रु. इतका आहे. सदर नळयोजनेचे काम गुत्तेदार यांनी 24 महिन्याच्या आत पूर्ण करण्याची हमी घेऊन तशा अटी व शर्तीवर करारनामा केला आहे. पण पाणीपुरवठा योजनेच्या काम चालू होऊन जवळपास 5 वर्षाचा काळ संपत आला तरी आजपर्यंत 100% काम पूर्ण झाले नसून हिमायतनगर शहरातील जनतेचे पाण्याअभावी भटकंती होऊन बेहाल होत आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. 
हिमायतनगर पाणीपुरवठा नळयोजनेचे काम चालू होऊन 5 वर्षाचा काळ संपत आहे. दिलेल्या मुद्दतीत काम केले गेले नसल्याने अद्यापपर्यंत मे.एम.टी.फड ह्या गुतेद्दरांना कोणत्याही प्रकारचा दंड का…? आकारण्यात आला नाही असा प्रश्न निवेदनात विचारला आहे. एकुणच यावरून कार्यान्वित यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नांदेड, ह्यांचे अधिकारी व कर्मचारी यांची कुठल्याही प्रकारचे कामावर नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. आजपर्यंत नगरपंचायत हिमायतनगर जि. नांदेड ह्याच्याकडून सदरील गुत्तेदारास कामाचा अडवांस बिल म्हणून 15.28 कोटी रु. इतका निधी पोहोचला असून, तरीदेखील काम अद्यापपर्यंत अपूर्ण स्वरूपाचे आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झाल्यापासून हिमायतनगर शहरातील जनतेच्या मनात एक आशेची किरण जागी झाली होती, पण आज 5 वर्ष झाली काम अपूर्ण आहे. पाण्याचे जलकुंभ उभारून देखील फिल्टरचे काम, पाण्याच्या टाक्याचे काम, व गावातील पाईपलाईनचे काम अपूर्ण स्वरूपाचे आहे. त्यामुळे शहरातील जनतेला पाणी मिळणे दुरापास्त झाल्याने नगरपंचयतीच प्रशासनाबद्दल जनतेत तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. येत्या दिनांक 4 जून 2024 पर्यंत कामाची स्थिती उंचावून हिमायतनगर शहरास पाणीपुरवठा चालू नाही झाल्यास दिनांक 05 जुन 2024 पासून आपल्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करणार असा इशारा निवेदनातुन शेख हनिफ यांनी टंचाईने त्रस्त झालेल्या शहरवासीयांच्या वतीने दिला आहे.
हिमायतनगर शहरातील पाणी टंचाई ने सर्वसामान्य नागरिकांना हैराण करून सोडले आहे, पैसेवाल्यांच्या घरी बोअर असून, मध्यमवर्गीय नागरिक 500 रुपयाला पाणी टाकी घेत आहेत, ही विदारक स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे. में हिटमुळे वाढती उष्णता नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करायला भाग पाडत आहे, 19 कोटींची नालयोजना होऊनही पाणी मिळत नसल्याने नाईलाजाने उपोषण करण्याचा इशारा द्यावा लागला असल्याचे शेख हनिफ सर यांनी सांगितले.
हि नळयोजना पूर्णत्वास जावी म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर नेहमीच पाठपुरावा करत आहेत, त्यामुळे ही योजना अंतिम टप्प्यात आली आहे, पाणी चेक केले जाते आहे, एका ठिकाणी लिकेज होते ते काढले जाते आहे,आता लवकरच पाणी हिमायतनगर शहरातील जनतेला मिळेल अशी माहिती नगरपंचयतचे पाणी पुरवठा कामाची देखरेख करणारे अभियंता भालेराव यांनी न्यूज फ्लॅश360शी बोलताना दिली.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!