नांदेड| तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात हैदराबादचे जिल्हाधिकारी कालीचरण खरतडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य, आंबेडकरवादी मिशनचे संचालक दीपक कदम, प्रशिक्षण केंद्राचे संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्रा. एस.एच. हिंगोले, प्रा. मधुकर जोंधळे, सिद्धांत इंगोले आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी कालीचरण खरतडे यांनी आपल्या परिवारासह श्रामणेर प्रशिक्षण केंद्रास सदिच्छा भेट दिली. त्यांच्या वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रामणेर प्रशिक्षण केंद्राच्या गाडी पार्किंग जागेत खरतडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यानिमित्ताने त्यांनी प्रशिक्षण केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, आजच्या काळात आंबेडकरी समाजाला अशा श्रामणेर प्रशिक्षण केंद्राची नितांत आवश्यकता आहे. भंतेजीच्या माध्यमातून चांगले कार्य सुरू आहे. ते पुढे नेण्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे ते म्हणाले.