हिमायतनगर, परमेश्वर काळे| तालुक्यातील पोलिस पाटील भरती प्रक्रिया नुकतीच संपन्न झाली असून, ऑनलॉईन घेण्यात आलेल्या परीक्षेत नाभिक समाजातील नितिका जोन्नापल्ले व संतोष वाघमारे यांनी यश मिळविले असून, त्यांची पोलिस पाटील पदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र नाभिक महामंडळ संघटनेच्या वतीने पुष्पहाराने सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
उपविभागीय अधिकारी कार्यालय हदगाव यांनी नुकतीच पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2023 मध्ये लेखी व मुलाखतीच्या निवड माध्यमातून घेतली असून, यात गुणवंत विद्यार्थ्यांनी आरक्षणानुसार सहभाग घेऊन परीक्षा दिली होती. हिमायतनगर तालुक्यातील मौजे कांडली बु. येथील संतोष माधव वाघमारे व मौजे पारडी येथील निकिता रवी जोनापल्ले या नाभिक समाजाच्या दोन उमेदवारांनी पोलीस पाटील भरती प्रक्रियेमध्ये यश संपादन करून नाभिक समाजाचे नाव उज्वल केले आहे.
महाराष्ट्र नाभिक महामंडळ तालुका शाखा हिमायतनगरच्या वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून निकिता रवी जोनापल्ले पार्डी व संतोष माधव वाघमारे कांडली बु. यांचा गावामध्ये जाऊन ग्राम पंचायत कार्यलयात समाज बांधवांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष गजानन चायल, सचिन कळसे, दिलीप कोंडामंगल सर, अवधूत बोडकेवाड, व्यंकटी गंधम, रमेश लिंगमपल्ले, प्रकाश घुंगरे, श्रीकांत घुंगरे, पप्पू सोळंके नागेश शिंदे, रवी जोनापल्ले, गणेश वाघबरे, आनंद गायकवाड, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले ,अशोक वाघमारे, दत्ता सोळंके, किरण सोळंके, गोविंद वाकेकर आदींसह महाराष्ट्र नाभिक महा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.