
हिमायतनगर। आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण देशभरामध्ये ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी स्वच्छता ही सेवा या अभियानाचे आयोजन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशवासीयांनी स्वच्छतेचा वसा घ्यावा. आणि देशवासीयांमध्ये ‘आरोग्यम् धनसंपदा’ हा विचार रुजावा या हेतूने हे अभियान राबविण्याचा सरकारचा हेतू आहे.
त्याचाच एक भाग म्हणून हुतात्मा जयंतराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ०१ ऑक्टोबर रोजी “स्वच्छता ही सेवा” अंतर्गत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ शिवाजी भदरगे यांनी ०१ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या एका तासाच्या वेळेत महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांच्या सहकार्यातून राबविण्यात आले.
या अभियान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शिवाजी भदरगे, प्रा . एम. पी. गुंडाळे, प्रा. एल. टी. डाके, प्रा. मुक्कावार सर, श्री राजू सोनकांबळे, सेवक राहुल भरणे आदींसह मोठ्या प्रमाणात रासेयोचे स्वंयसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
