धर्म-अध्यात्मनांदेड

गुरुकृपा महिला मंडळ, सिडको यांच्या वतीने श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळ्याचे आयोजन

नवीन नांदेड। गुरुकृपा महिला मंडळ, सिडको याच्या वतीन श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळा आयोजित केला आहे.श्री शिवमहापुराण कथेचा प्रारंभ ९ मार्च२४ रोज शनिवारी झाला असुन समारोप १८ मार्च २४ रोज सोमवारी होणार आहे.

शिवकथाकार म्हणून श्री अनिल महाराज (माजलगावकर) यांच्या हस्ते दुपारी १ ते ५ दरम्यान शिवकथा संपन्न होणार आहे.हा कथा कीर्तन सोहळा एन. डी. ४१ के. १ सिध्दी अष्टविनायक गणपती मंदीर जवळ दत्त नगर सिडको येथे आयोजन करण्यात आला आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळाचे आयोजन केले असुन श्री अनिल महाराज माजलगावकर यांच्या सुमधुर वाणीतून दुपारी १ ते ५ वाजेपर्यंत शिवकथा वाचन होणार आहे यासाठी संगितकार म्हणून ह.भ.प.श्रीधर पांचाळ, घुंगराळा (तबला वादक) व ह.भ.प.श्रीराम दिग्रसकर, दिग्रस (सिंथ वादक) म्हणून सहभागी होणार आहेत.श्री शिवमहापुराण (शिवकथा) व किर्तन सोहळ्यासाठी पुढील प्रमाणे कार्यक्रम निश्चित केले आहेत.

०९ मार्च २४ मंगलाचरण, ज्योतिलिंग उत्पत्ती, भैरव उत्पत्ती, लिंग महात्म, रुद्राक्ष महिमासहिता (विद्देश्वर सहिता) १० मार्च २४ नारदगर्व, सृष्टी उत्पत्ती, शिवपुजा व महत्व,दक्षउत्पत्ती, हर्यश्व, संवलाश्य,सती शिवपुजन,सती शंकरविवाह,सती चरित्र, (रुद्रसंहिता खंड १व२) ११ मार्च २४ रोजी हिमवंताचा विवाह, पार्वतीजन्म, भोमजन्म, हिमशंकरभेट, नटराज ब्राम्हणवेशात शिव, सप्तऋषी (रुद्रसंहिता खंड३) सोमवार १२ मार्च २४ शिवपार्वती विवाह, पातिवृत्त वृत्तभंग धर्म, गणेश व कार्तिक जन्म, पृथ्वी प्रदक्षिणा, जालंधरवृंदा, ११ रुद्र (रुद्रसंहिता खंड४) मंगळवार १३ मार्च २४ त्रिपुर जन्म-वध, इंद्राला जिवदान, जालंदर किर्तीमुख, वृंदा पतिवृत्तभंग, तुलसी महात्म, उषाः अनिरुध्द, (रुद्रसंहिता खंड५) बुधवार १४ मार्च २४ शिवाचे पाच अवतार, अर्धनारी नटेश्वर, नंदिश्वर अवतार लग्न,द्विजेश्वर, कृष्णदर्शन गुरुवार अवतार, भिक्षुक अवतार, नल-दमयंती १५ मार्च २४ द्वादश ज्योतिलिंग, व्याघेश्वर (महाशिवरात्र कथा), मुक्ती व भक्ती विवेचन (कोटीरूद्र संहिता)

दि.१६ मार्च २४ पापपरिचय नरक वर्णन (उमासंहिता), उमाचा कालिका अवतार, महावाक्य (कैलाससंहिता), गुरुपदेश, शिवप्राण गौरी पशुपत्तीवृत्त दि १७ मार्च शिवपुराण महात्म, देवराज (चंचुला बिदुंग महात्म)१८ मार्च २४ कालाकिर्तन व महाप्रसाद सोमवार ह.भ.प. अनिल महाराज माजलगांवकर यांच्या किर्तनानंतर महाप्रसादाला सुरुवात होणार आहे , हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सौ.नंदा काचावार(अध्यक्ष), सौ.पंचफुला वाळके (उपाध्यक्ष), सौ.राधाबाई जोशी (सचिव), सौ.सिंधु बागडे (सहसचिव), कौशल्याबाई कदम (कोषाध्यक्ष), सौ.दायक्षणीबाई महाजन, सौ.कविताबाई उदगिरकर सौ. प्रतिभा कुलकर्णी ,सौ.विजया खंडाळे,सर्व सदस्या, कार्य समिती व समस्त गुरुकृपा महिला मंडळ, सिडको व या कार्यक्रमाचे मार्गदर्शन म्हणून प्रा.डाॅ.राजकुमार उदगीरकर,शंकर काचावार,दिलीप महाजन,प्रभाकर कुलकर्णी,गोपाल शर्मा हे सहकार्य करत आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!