
नांदेड। महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या 8 वर्ष आतील,10वर्ष आतील व 12 वर्षाखालील गटातील मुले व मुलींच्या राज्यस्तरीय सब- ज्युनियर स्पर्धेसाठी नांदेड ज़िल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने *जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी स्पर्धा स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ क्रीडा मैदान विष्णुपुरी नांदेड येथे दि. 14 जानेवारी रविवार 2024 रोजी सकाळी 8:00 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.
यामध्ये 8 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा – 50 मी ,100मी,लांब उडी, बॉल थ्रो व 10 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा 60 मी,100मी , लांब उडी ,1kg गोळा फेक आणि 12 वर्षाखालील मुले व मुलींची स्पर्धा – 60मी , 300मी , उंच उडी , लांब उडी , गोळा फेक, या स्पर्धा होणार आहेत यास्पर्धेमधून विजयी खेळाडू मुले व मुलींची निवड नांदेड जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत), २ पासपोर्ट साइज फोटो, फी ,सोबत आणावे.*याच ठिकाणी 14 व 16 वर्षे आतील वयोगटातील मुला मुलींसाठी अंतर जिल्हा राष्ट्रीय स्पर्धा (NIDJAM अहमदाबाद गुजरात येथे 16ते 18 फेब्रुवारी2024 दरम्यान संपन्न होणाऱ्या स्पर्धेसाठी देखील निवड होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी, या स्पर्धा ठिकाणी नोंदणी करावी
08 वर्ष – 11 /02/2016 ते 09/02/2018
10 वर्ष- 11/02/2014 ते 09/02/2016
12 वर्ष-11/02/2012 ते 09/02/2014 दरम्यान जन्मदिनांक असणारे सहभागी होऊ शकतात.
यासाठी विष्णू पूर्णे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून गोविंद पांचाळ,बालाजी गाडेकर,गंगाधर हंबर्डे, रुपाली कुलकर्णी,साईनाथ दंतुळवाड, यांची निवड करण्यात आली आहे.स्पर्धा प्रमुख म्हणून वैभव दोमकोडवार ज्ञानेश्वर सोनसळे याची निवड करण्यात आली आहे. या अजिंक्य पद स्पर्धा व निवड चाचणी मध्ये अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष राजा खंडेराव देशमुख पळशीकर व सचिव प्रलोभ कुलकर्णी यांनी केले आहे.
अधिक माहिती साठी प्रलोभ कुलकर्णी ,विष्णु पूर्णे सर 7588430145, वैभव दोमकोंडवार 9689939373 , ज्ञानेश्वर सोनसळे 9970356228, गोविंद पांचाळ 9146819813 नांदेड , शब्बीर शेख 8805023440 धर्माबाद, बालाजी गाडेकर भोकर 9921855097, शरद कपाटे 7709999896 नायगाव, ज्ञानेश्वर कोंडलांडे 9970356228 बिलोली. संतोष वाकोडे सर 7588430065 हदगाव, कृष्णा तलवारे सर 9657707295 देगलूर शिधोधन नरवाडे8007704359. यांच्याशी संपर्क साधावा.
