क्राईमनांदेड

तेलंगणा राज्याच्या सिमेलगत गावातील मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश

नांदेड| तेलंगणा राज्य सार्वत्रिक विधानसभा निवडणूक-2023 ची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने तेलंगणा राज्याच्या सीमेपासून 5 कि.मी. परिसरातील नांदेड जिल्ह्याच्या हद्दीतील सर्व किरकोळ देशी, विदेशी व ताडी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमीत केले आहेत.

हा आदेश दिनांक 28.11.2023 रोजी सायं 5 वाजेपासून ते दिनांक 30.11.2023 रोजी मतदान संपेपर्यंत लागू राहिल. याचबरोबर मतमोजणीच्या दिवशी 3 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश लागू राहिल. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) मधील तरतुदीनुसार हा आदेश निर्गमित केला आहे.

या निवडणुकीचे मतदान 30 नोव्हेंबर 2023 रोजी तर मतमोजणी 3 डिसेंबर 2023 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधितावर गुन्हा दाखल करून अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!