नांदेड| मोटार सायकल चोरी करून गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकास वजीराबाद गुन्हे शोध पथकाने एकास अटक करून ताब्यात घेतले आहे. याबाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुरज गुरव, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पोलीस ठाणे अंतर्गत सतत पेट्रोलींग ठेऊन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरून हि कारवाई करण्यात आली असून, या गुन्हेगारांकडून तीन मोटरसायकलीसह गावठी पिस्टल व असा १ लक्ष ६० हजारच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर सुचनांप्रमाणे मा. अशोक घोरबांड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोहेकों/ दत्तराम जाधव, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकॉ/ शेख इंसान शेख एजाज, पोकों/ रमेश सुर्यवंशी, पोकी भाऊसाहेब राठोड, पोकों अरुण साखरे यांनी पोलीस ठाण्याचे अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी तयार करुन त्यांना चेक करीत पो. स्टे हद्दीमध्ये सतत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक बातमी मिळाली की, अभिलेखावरील गुन्हेगार प्रेमसिंघ धरमसिंघ रामगडीया, वय 22 वर्ष व्यवसाय बेकार राहणार शिखारघाट ता. मुदखेड जि. नांदेड हा बाफना रोडवर बिनाक्रमांकाच्या मोटरसायकलवर उभा असुन त्याचे कमरेला गावठी पिस्टल आहे.
अशी माहीती मिळाल्यावरुन नमुद पोलीस अंमलदार यांनी त्यास पकडुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे अंगझडतीमध्ये एक गावठी पिस्टल मिळुन आली. त्यास त्याचे ताब्यातील मोटरसायकल बाबत विचारणा केली असता ती चोरी केल्याचे सांगितले. त्यास अधिक विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्याने ईतर दोन चोरी केलेल्या पॅशन प्रो मोटरसायकल घरी असल्याचे सांगत असल्याने त्याचे राहते घरी शिखारघाट येथुन दोन मोटरसायकली जप्त केल्या आहेत. सदरच्या दोन्ही मोटरसायकल चोरीच्या असल्याची खात्री झाली आहे.
सदर प्रकरणी पोहेकों दत्तराम जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलीस ठाणे वजीराबाद, नांदेड येथे शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास सपोनि दत्तात्रय मंठाळे हे करीत आहेत. बेकायदेशिर शस्त्र बाळगणे व मोटरसासकल चोरी प्रकरणी नमुद ईसमास अटक करुन गुन्हे उघडकीस आणल्या प्रकरणी वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.