हिमायतनगर| देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांच्या संकल्पनेतून आज संपूर्ण देशभरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त श्रमदानातून आदरांजली अर्पण केली जात आहे. त्याचा पार्श्वभूमीवर आज सिरंजनी येथेही स्वच्छता अभियान राबवून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंती निमित्त महाश्रमदान करण्यात आले.
हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथे सत्ता बदल होऊन सौ मेघा पवन करेवाड यांनी सरपंच पदाची सूत्र हातात घेतल्यापासून हिरण्यगर्भ बहुद्देशीय प्रतिष्ठान चे सचिव श्री पवन करेवाड यांच्या पुढाकारातून युवक व गावकरी बांधवांच्या सहकार्याने ग्रामचैतन्य श्रमदान अभियान सुरु केले आहे. त्यामुळे गावात श्रमदानातून स्वच्छता ही गोष्ट नित्याची झाली आहे. गावाकऱ्यांकडून नियमित पणे श्रमदान करून या श्रमदान अभियानाला चळवळीचे रूप प्राप्त झाले आहे.
देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गावातील युवकांनी 1 ऑक्टोबर रोजी महाश्रमदान घेण्याचे ठरवले. या श्रमदान अभियानात गावातील लहान-थोर, अबाल- वृद्ध, सर्व पक्षीय व सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी मोठा सहभाग घेऊन ग्रामपंचायत परिसर, अंगणवाडी परिसर व आरोग्य केंद्र परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला.
स्वच्छता ही आपली संस्कृती आहे आणि ती आपण जपली पाहिजे -श्रीमती उझमा पठाण
सन्माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आव्हानमुळे आजच्या महाश्रमदानाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. सिरंजनीतील गावकऱ्यांच करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण स्वच्छता ही आपली संस्कृती आहे आणि ती जोपसण्याचं काम गावकरी प्रामाणिकपणे पणे करतांना मी अनुभवत आहे अशी भावना सिरंजनी च्या ग्रामसेवक श्रीमती उझमा पठाण यांनी व्यक्त केली.पुरुषांप्रमाणेच महिलांनी सुद्धा श्रमदान अभियानात “हम भी किसी से कम नही” हे दाखवून दिले.अंगणवाडी सेविका, मदतनीस,अशा वर्कर, महिला बचतगट प्रतिनिधी यांच्यासोबत असंख्य महिलांनी श्रमदानात सक्रीय सहभाग घेतला होता.
गावकरी बांधवांचे श्रमदानात निःस्वार्थपणे होणाऱ्या योगदाणामुळे प्रेरित होऊन सरपंच सौ मेघा करेवाड यांनी ग्रामपंचायत ला स्वतः ची घंटागाडी उपलब्ध होईपर्यंत घरगुती कचरा वाहतूक करून त्याची गावाबाहेर विल्लेवाट लावण्यासाठी स्वखर्चातून आठवड्यातून तीन दिवस ट्रॅक्टर उपलब्ध करून देत आहे. गावाकऱ्यांनी घरगुती कचरा सार्वजनिक ठिकाणी न टाकता तो साठवून ट्रॅक्टर मध्ये टाकावा अशी विनंती केली व महाश्रमदानात सहभागी झालेल्या सर्व गावाकऱ्यांचे आभार व्यक्त केले .