राम जन्मोत्सव निमित्ताने बाल कलाकारांनी राम लक्ष्मण सिता यांच्यी वेषभूषा साकारली
नवीन नांदेड। श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने हडको येथील श्रीराम मंदिरात बाल कलाकारांनी राम लक्ष्मण सिता यांच्या विविध भूमिका सादर केल्या यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
श्री राम मंदिर हडको येथील मंदिरात १७ एप्रिल राम जन्मोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, या मध्ये चिमुकल्या बाल कलाकारांनी राम लक्ष्मण सिता व हनुमानाची झाॅकी तसेच श्रीराम भक्तीवर आधारीत गीतांवर सुंदर नृत्य सादर केली. सहभागी बाल कलाकारांना जनार्दन ठाकूर,संजय पाटील घोगरे,माजी नगरसेवक संदीप पाटील चिखलीकर,गजानन कते, संतोष गुटे,यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस वितरण करण्यात आले.
राम जन्मोत्सव निमित्ताने विधीवत पुजन,महा अभिषेक, महाआरती, सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले, यशस्वीते साठी मंदिर समिती पदाधिकारी,ऊदय पाध्ये, रहाटकर सावकार,तमेवार, शिवनराव शिरसाट, विनायक जोशी,अजय फड, मारोती कोल्हे, गणेश जाधव, नचिकेत बिडव ई,राहुल शिंदे,शिवा मुकनवार,शिंदे, संतोष साधु, यांच्या सह अयोध्या नगर राम मंदीर मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.या सोहळ्यासाठी परिसरातील विविध भागातील महिला, युवक, नागरीक यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.