चतुर्थीच्या दिवशी चार लाखावर भाविकांनी घेतले श्री रेणुका मातेचे दर्शन; मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल
चतुर्थीच्या दिवशी श्री रेणुका मातेला नारंगी रंगाचे पैठणी महावस्त्र अर्पण; लाखो भाविक माहूरगडावर दाखल झाल्याने प्रशासनाचे सर्व विभाग हतबल
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे।श्रीक्षेत्र माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी सकाळी ७ वाजता मातेच्या वैदिक महापुजेस सुरुवात करण्यात आली, त्यानंतर मातेला अलंकारासह नारंगी रांगाचे पैठणी महावस्त्र अर्पण करून वेद पारायण सुरु करण्यात आले,यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी संजय कान्नव विश्वस्थ पुजारी यांच्या उपस्थितीत दुर्गा सप्तशती शतचंडीपाठास हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली.
दुपारी पायस नैवेद्य व आरती झाल्यानंतर छबीना मिरवणूक काढण्यात आली, परिवार देवतांचे पूजन झाल्यानंतर भाविकासाठी भगवान परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद महा अन्नदान सुरू करण्यात आले, यानंतर मातेस पायस महानैवेद्य, गाईचे तूप, आणि केळी अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाआरती द्वारे दुपारचे धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात आले, चतुर्थीच्या दिवशी माता दरबारात पिसा देव छत्रपती संभाजी नगर येथील श्री जगदंब म्युझिकल ग्रुप यांनी भजन सादर केले, दहिसर येथील दीपिका जोशी यांनी गायन सादर केले, नरसी नायगाव जिल्हा नांदेड येथील गणेश हाके ,सरस्वती कुमारी यांनी गायन सादर केले, छत्रपती संभाजीनगर येथील शांती भूषण व कल्याणी चारठाणकर यांनी गायन सादर केले. पुणे येथील भक्ती उदय पांडव यांनी बहारदार नृत्य सादर केले, जालना येथील भक्ती सुनील पवार हिने गायन सादर केले, पुणे येथील अंबिका व श्रीपाद लिंबेकर यांनी गायन भक्तीमय वातावरणात सादर केले यावेळी हजारो भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
श्री रेणुका माता मंदिरात चौथ्या माळेच्या दिवशी श्री रेणुका देवी संस्थानाचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्षा तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुरेखा कोसमकर,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुमारीका पूजन करण्यात आले, यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, विनायकराव फांदाडे, आशिष जोशी, अरविंद देव, दुर्गादास भोपी, बालाजी जगत यांचे सह पुजारी भवानीदास भोपी, राजू भोपी, जहागीरदार शुभम भोपी ,ॲड उज्वल भोपी, आनंद देव, निलेश केदार गुरुजी, मनोज बनसोडे, यांचे सह सर्व मानकरी व्यवस्थापक योगेश साबळे स.व्य नितीन गेडाम, लिपिक अरविंद राठोड यांचेसह सर्व कर्मचारी भाविकांच्या उपस्थितीत होते. कुमारिका पूजनासाठी मानकरी ठरलेल्या खुशी गोपाल खापर्डे हिचे कुमारिका पूजन आनंदात पार पडले.
शहरातील व्यापारी व भाविक वैतागले
घटस्थापना पासून पाहीजे तेवढी भाविकांची गर्दी नव्हती त्यामुळे प्रशासनास गर्दी होणार नाही असे वाटले ? परंतू रविवारची सुट्टी असल्याने अचानक गर्दी वाढली.खाजगी वाहनास गडावर जाण्यास बंदी असल्याने एसटी कडून १०० बस मागविण्यायत येणार असल्याचे आगार प्रमुख यांनी आढावा बैठकित सागितले होते, पंरतु प्रत्येक्षात तेवढ्या बसेस नसल्याने भाविकांनी कोंबून प्रवास करावा लागत आहे.याच मात्रुतिर्थ रस्त्यावर असलेली न.प.ची पार्किंग सकाळी ९ वा फुल झाल्याने पेट्रोल पंपासह खाजगी हाॅटेल,लाॅज समोरील मोकळ्या भूखंडावर वाहन लावण्यास सुरुवात झाल्याने शहरातील व्यापारी वर्ग अक्षरशा वैतागून गेल्याची तर भाविकांचे मोठे हाल होत झाल्याची माहीती समोर आली आहे.
नवराञी नियोजन आढावा बैठकीचे तिन तेरा.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक संस्थांचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांच्या अध्यक्षतेखाली,तर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना कावली, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव यांचेसह इतर विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती, सर्व विभाग प्रमुखांनी उत्सव नियोजन योग्य रीत्या पार पाडल्या जाईल असे सागितले होते,मात्र प्रत्येक्षात एस.टी महामंडळ,रेणुका देवी संस्थान,आरोग्य विभाग,अन्न व औषध विभाग, सार्वजनिक बांधकांम विभाग,यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मात्र पाहिजे तशी होत नसल्याने महाराष्ट्राच्या काण्याकोपर्यातून आलेल्या भाविकांचे हाल होत असल्याची माहिती भाविक भक्तांनी दिली आहे.
रेणुका माता मंदीरात व्ही.आय.पी भक्तांचा सुळसूळाट
देवी देवतांचे माहेर घर असलेल्या माहूरगडावर नवराञ उत्सवानिमित्त श्री.रेणुका मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातल्या अनेक काण्या कोपर्यातून भाविक येत असतात,या ठिकाणी नवरात्रीच्या काळात मोठी गर्दी असते, त्यामुळे बाहेरुण येणार्या भाविकांना तासोनतास रांगेत उभे राहून मातेचे दर्शन घ्यावे लागते.असे असतांना दुसरीकडे माञ मंदिरात दर्शन घेण्यासाठी व्हि.आ.पी भक्तांचा सुळसुळाट पाहावयास मिळाला आहे.