श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। शेतकरी आणि बैलाचा सण असलेल्या पोळा सणानिमित्त बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या एका नवतरुण युवकांचा व बैलाचा विजेच्या धक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथे घडली आहे. मृत युवक शेतकरी पुत्र असूण विलास धारासिंग राठोड (३१) असे त्या मृतकाचे नांव आहे. ऐन पोळ्याच्या सणाला हिवळणी येथे शोककळा पसरली आहे.
सोमवारी, २ सप्टेंबर रोजी माहूर तालुक्यात पोळ्याची धूम सुरू असताना विलास धारासिंग राठोड हा तरुण आपल्या बैलाला घेवून नेहमी प्रमाणे शेतात घेवूण गेला.व दोन बैला पैकी एका बैलाच्या पायाला जिवंत विद्युत तार आडकला ते पहाताच विलास आपल्या बैलाला वाचविण्यासाठी गेला असता त्याला हि विद्युत शाॅक लागून जागीच बैलाचा व त्याचा हि जागीच अंत झाला. दोघांचे मृतदेह हाती लागले असून त्यांच्या मूळ गावी हिवळणी येथे पोळा सणाच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
प्राप्त माहितीनुसार सिंदखेड पोलीस ठाण्याचे जमादार गजानन कुमरे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.तर आष्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात विशासला शविच्छेदनासाठी अणून डॉ. संदेश राठोड यांनी शविच्छेदन केले.