किनवट/माहूर| माहूर तालुक्यातील बाई बाजार व किनवट तालुक्यातील गोंडखेडी येथील आदिवासी मजुरांच्या संशयीत मृत्यू प्रकरणी आ भीमराव केराम यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केल्याने याची गंभीर दाखल घेतली गेली आहे. या प्रकरणी नांदेडचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षकांना आयोगाने १० आकटोबर रोजी नोटीस बजावून ७ दिवसाच्या आत या घटनेबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील बाई बाजार येथे दि ५ आकटोबर रोजी ग्रा प कार्यालया अंतर्गत सीसी नालीचे बांधकाम सुरु असताना ३ आदिवासी मजुरावर भित कोसळल्याची घटना घडली होती. या घटनेत १ जण जागीच ठार झाला तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेपूर्वी गोंडखेडी येथेही सार्वजनिक अर्धवट विहिरीत पडून एका आदिवासी युवकांचा मृत्यू झाला होता. ग्रा प व संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या घटना घडल्या असल्याचा आरोप स्थानिक आदिवासी नागरिकांनी केला असून, दोन्ही घटनेची चौकशी करण्याची मागणी केली.
यावरून आ भीमराव केराम यांनी या घाटाने प्रकरणी मयताच्या कुटुंबियांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अनंत नायक यांच्याकडे तातडीने भ्रमणध्वनीद्वारे तक्रार करून वृतपत्र कात्रने पाठवली. त्यांच्या तक्रारीची गंभीर दखल घेत आयोगाचे सहा निदेशक दीपिका खन्ना यांनी दि १० आकटोबर रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्णा कोकाटे यांना नोटीस बजावली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३३८ अंतर्गत तक्रारीच्या अनुषंगाने चौकसी करण्याचे आयोगाने निश्चित केले आहे.
सदर घटनेसंबंधाने अनुषंगिक बाबी, आरोपी व आरोपीवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ७ दिवसाच्या आता सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. विलंब झाल्यास समक्ष हजर राहण्याबाबत समन्स बजावण्यात येईल अशी ताकीदही आयोगाने दिली आहे. आ. भीमराव केराम यांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनु. जाती जमाती आयोगाने जिल्हा प्रशासनाला धारेवर धरल्याने आता वाई ग्राम पंचायत व संबंधित ठेकदार यांच्यावर काय..? कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.