नांदेड। महाराष्ट्र राज्य हिवताप सहकारी पतपेढी म.नांदेड यांची संचालक मंडळ निवडणूक २०२३-२८ करीता आज घटस्थापना व शारदीय नवरात्रोत्सवच्या शुभ मुहूर्तावर विकास सहकारी पॅनलचा प्रचार शुभारंभ आज शिव मंदिर चैतन्य नगर नांदेड येथून नारळ फोडून करण्यात आले. तसेच प्रचारचे पाम्पलेट, उमेदवार निशाणी स्टिकर व बॅनरचे विमोचन करण्यात आले. विकास सहकारी पॅनलचे प्रास्ताविक, उमेदवार यांची माहिती, पुढील पतसंस्थेचे नियोजन याची माहिती महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान सचिव सत्यजीत टिप्रेसवार यांनी दिली.
हिवताप पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सुभाष कल्याणकर, चेअरमन उमाकांत वाखरडकर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक माणिक गिते, पंच चंद्रभान धोंडगे, सभासद हनमंत वडजे, शंकर चव्हाण, आरोग्य सहाय्यक व्यंकटेश पूलकंठवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले व विकास सहकारी पॅनलचे उमेदवार यांच्या ” शिलाई मशिन ” या निशाणीवर दि. २२ ऑक्टोबर २०२३ रोज रविवारी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादीत नांदेड येथील कार्यालयात मगनपुरा येथे मतदान करुन प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले .
नांदेड शहरातील सभासद हिवताप/हत्तीरोग कर्मचारी यांना प्रत्यक्ष भेटून विकास सहकारी पॅनलचे सर्व उमेदवार यांच्या ” शिलाई मशीन ” या निशाणीवर मतदान करून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे आश्वासन सभासद दिले. यावेळी पॅनल प्रमुख उमेदवार सुभाष कल्याणकर, सत्यजीत टिप्रेसवार, माणिक गिते, पप्पू देसाई, मोहन पेंढारे, चंद्रभान धोंडगे, बालाजी आळणे, मनोहर खानसोळे, अशोक ढवळे, विठ्ठल मोरे, संतोष माकु, व्यंकट माचनवाड, गिरीश पाटील उमेदवार, उमाकांत वाखरडकर, गणेश ताडेवाड, व्यंकटी बकाल, हणमंत वडजे, व्यंकटेश पुलकंठवार, रघुनाथ हुंबे, प्रदिप गोधने, महेश सातारे, मनोज तेलंग,अर्जुन सावंत, शेख खाज्या, शंकर चव्हाण, रमेश वाघमारे, बालाजी चांडोळकर, राजेंद्र चिंतलवार, किरण कुलकर्णी, श्याम सावंत, गंगाधर पुजरवाड व आत्माराम जाधव आदी कर्मचारी व सभासद बांधव उपस्थित होते.