नांदेड। विष्णूपूरी येथील डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील मृत्यूला जबाबदार असणार्या राज्य शासनाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी दि.१२ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जबाब दो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचीत बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहेमद यांनी आज सोमवार दि.९ रोजी देण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवा नरंगले, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीअंबीरे, महासचिव श्याम कांबळे, युवा आघाडीचे राज्य सदस्य अक्षय बनसोडे, तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, युवा जिल्हाध्यक्ष धिरज हाके, गोपालसिंह टाक सम्यक विद्यार्थी आघाडीचे कैलास वाघमारे, जिल्हाध्यक्ष भिमराव सुर्यवंशी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना फारूख अहेमद म्हणाले की, मागील सोमवारी नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांमध्ये २४ मृत्यूची नोंद झाली होती आजपर्यंत ही मालीका चालूच आहे. आजपर्यंत मृत्यूचा हा आकडा १२० पेक्षा अधिक गेला आहे. रुग्णांचे मृत्यू अपुर्या कर्मचारी व औषधांच्या तुटवड्यामुळे झालेले असतांना राज्य शासनाकडून या बाबत सर्वसामान्यांची दिशाभुल केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आला.
नांदेड शहरातील जुने श्रीगुरूगोविंदसिंघजी शासकीय रुग्णालय १ हजार खाटांचे करुन आवश्यक त्या सर्व अद्यावत सुविधा उपलब्धेसह तात्काळ सूरू करण्यात यावे, शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपूरी येथील औषधी पुरवठा सर्वच टेंडर यातील भ्रष्टाचाराची व त्याच बरोबर येथे घडलेल्या रुग्ण हत्या कांडाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाव्दारे चौकशी करण्यात यावी तसेच रुग्णांच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार असणार्यावर कारवाई करावी, रुग्णालयात स्टंटबाजी करत अधिष्ठातांना शौचालय साफ केल्या प्रकरणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर ऍट्रासिटी कायद्या अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक करावी.
त्याचबरबर ऍट्रासिटी कायद्या विरोधा भूमिका घेऊन खा.हेमंत पाटील यांच्या संविधान विरोधी कृतीचे समर्थन करण्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. शहरातील देगलूरनाका परिसरात असलेल्या हैदरबाग येथील मनपा प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या शासकीय रुग्णालयाते विस्तारीत केंद्र १०० खाटांचे बाळांतपणाच्या सुविधेसह रुग्णालय सूरू करण्यात यावे. त्याच बरोबर पावडेवाडी परिसरात नव्याने प्रस्तावीत असलेल्या रुग्णालयाचे काम तात्काळ सूरू करण्यात यावे या मागणीसाठी येत्या १२ ऑक्टोबर रोजी जबाब दो आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.