ऐन दिवाळीतच आनदांच शिदाच संच कमी पुरवल्या – स्वस्त धान्य दुकानदारअसोशिएन
हदगाव, शे.चांदपाशा| ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासनाद्वरे पुरविण्यात येणारे आनंदाच शिदा किट(संच )मागणी पेक्षा कमी पुरविल्या मुळे कार्डधारकांच रोष पत्काराव लागत आहे. अश्या अशायाचे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशन हदगावच्या वतीने तहसिलदार यांना देण्यात आलेले आहे.
त्यांनी दि.9 नोव्हेंबर 2023 ला निवेदनात म्हटले आहे की, शासनाने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 55093 आनंदाचा शिदा (किट) आवश्यकता असतांना फक्त 50558 किट उपलब्ध करुन देण्यात आलेल्या असुन 4535 एवढ्या किट कमी आहेत. या बाबतीत शासनाने एवढ्या कमी किट देण्याचे कारण समजले नसले तरी एवढ्या किट कमी असल्याने कार्डधारकांना रोषाला समोरे जावे लागणार आहे. या करिता शासनाने त्वरीत आनंदाचा शिधा दिवाळी सणा अगोदरच उपलब्ध करुन दयावे आशी मागणी ही निवेदनात करण्यात आलेली आहे.
या बाबतीत न्यूज फ्लॅशचे प्रतिनिधीने तहसिलदार यांचेशी संपर्क साधला आसता साहेब मिटींग मध्ये आसल्याचे सागण्याण्यात आले. या निवेदनावर स्वस्त धान्य दुकानदार आसोशिएनचे अध्यक्ष चंपतराव पाटील, उपाध्यक्ष अ.ज. देशमुख, सचिव मिलिंद खदारे याच्या सह्या आहेत.