विश्व चषक सामना निमित्त संस्कार भारतीच्या वतीने भारतीय क्रिकेट खेळाडूंचे रांगोळी पोर्ट्रेट साकारणार
नांदेड। दि.१९ नोव्हेंबर २३ (रविवार ) ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषकाचा अंतीम सामना अहमदाबाद येथे रंगणार आहे. त्यानिमित्ताने विश्व चषक सामना संस्कार भारतीच्या वतीने भारतीय क्रिकेट खेळाडूंचे रांगोळी पोर्ट्रेट साकारणार आहे.
भारतीय क्रिकेट टीम ला नांदेडकराच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी प्रसिद्ध रांगोळी कलाकार व चित्रकार संतोष पाठक (गंगाखेड) आणि संस्कार भारती नांदेड ची भु अलंकरण समिती कलाकार हे भारतीय क्रिकेट टीम मधील ११ खेळाडूंचे टूडी व सचीन भारत रत्न सचिन तेंडुलकर यांचे थ्रीडी रांगोळीच्या स्वरुपात चित्र काढणार आहेत. हे वैशिष्ट्यपूर्ण रांगोळी प्रदर्शन शनिवार दि.१८ नोव्हेंबर २०२३ सकाळी १० वाजल्यापासून पाहण्यासाठी खुले होणार असुन सोमवार सायंकाळ पर्यंत नांदेडकरांना याचा आनंद घेता येईल.
हे रांगोळी प्रदर्शन डॉ. हंसराज वैद्य यांच्या हॉस्पिटलचा तळ हॉल, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर वजिराबाद चौक, नांदेड येथे असणार असून या प्रदर्शनीचे उदघाटन उद्या शनिवारी डॉ. हंसराज वैद्य, धर्म भूषण दिलीप ठाकूर व प्रा. डॉ.जगदिश देशमुख (महामंत्री संस्कार भारती, देवगिरी प्रांत) यांच्या उपस्थितीत शनिवार दि.१८ नोव्हेंबर २३ सकाळी १० वाजता होणार आहे. नांदेड शहरातील कलाप्रेमी, क्रिकेट प्रेमी नागरिकांनी संस्कार भारतीच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला भेट द्यावी असे आवाहन संस्कार भारती नांदेड महानगर अध्यक्ष सौ. राधिका वाळवेकर, जिल्हाध्यक्ष जयंतराव वाकोडकर, सचिव सौ. अंजली देशमुख यांनी केले आहे.