
नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन 2024-25 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
या वर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाची संकल्पना निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य ही होती. या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, राज्य व देशाच्या तुलनेत माता व बालमृत्यू दर कमी करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सगीता देशमुख, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिरानी, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. शेख बालन, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सतीश पुपलवाड, डॉ. अमर चव्हाण आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील विविध स्तरांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये डॉ. के.पी. गायकवाड, डॉ. प्रवीण मुंडे, डॉ. श्रीकांत देसाई, डॉ. कासराळीकर, डॉ. रमेश गवाले, डॉ. मोहन देवरावे, डॉ. जे.टी. कांबळे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सगीता देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संदेश जाधव यांनी तर उपस्थितांचे आभार डॉ. सलमा हिरानी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. संतोष सूर्यवंशी, डॉ. शिवशक्ती पवार, अनिल कांबळे, डॉ. सत्यनारायण मुरमुरे, डॉ. अन्सारी, जुनेद शेख, दराडे, सुभाष खाकरे यांनी योगदान दिले.
