ऑपरेशन चा नाही आयुर्वेदाचा डॉक्टर ” इफेक्ट्” हळूहळू होतो–उपजिल्हाधिकारी डॉ मंडलिक
लोहा। प्रशासनात काम केले पाहिजे. जे उद्दिष्ट दिले आहे त्याची पूर्तता झाली पाहिजे .लोहा .कंधार तालुका काम करण्यास अवघड आहे असे म्हणतात ते खरे नाही.दोन्ही तालुक्यातील जनता- लोकप्रतिनिधी राजकीय कार्यकर्ते यांची साथ मिळाली. मी ऑपरेशनचा नाही तर आयुर्वेदाचा डॉक्टर आहे .माझे उपचार हळूहळू इफेक्ट दाखवतात आपल्या सर्वाची साथ मिळाली संधी मिळाली तर पुन्हा नांदेड जिल्ह्यात येऊ असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक यांनी केले.
लोहा कंधार महसूल विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक यांनी शिरपूर (जि.धुळे) तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांची उदगीर येथे तर कंधार येथे तहसीलदार म्हणून नव्याने रुजू झालेले तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन उपविभागीय अधिकारी डॉ शंकरराव लाड यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयाच्या हॉल मध्ये पार पडला.
उपविभागीय अधिकारी डॉ मंडलिक यांनी दिलखुलास मनोगत व्यक्त करताना लोहा कंधार तालुक्यात कामे करताना अडचणी येतात दोन्ही तालुके कठीण आहेत अस म्हणतात पण तसे जाणवले नाही आणि येथील सर्वांची साथ सहकार्य मिळाले. आपण ऑपरेशन चा नाही आयुर्वेदिक डॉक्टर आहे .त्यामुळे हळूहळू इफेक्ट्स होतो असे मिस्कीपणे टिप्पणी करत त्यांनी अनेकांची फिरकी केली. आपण प्रशासनाचे देणे लागतो. काम व्यवस्थित पणे केले पाहिजे.
ज्या कालावधीत उद्दिष्ट दिले ती आपल्या सर्वांच्या मदतीने पूर्ण करता आली आपल्या सहकार्यामुळेच पुरस्कार मिळाले असे नमूद करताना पुन्हा नांदेड मध्ये येण्याचा आशावाद व्यक्त केला. आपल्या कामाचे जे मीडियात येते ते प्रशासनाचे प्रतिबंध उमटते सर्वांचे तसेच तलाठी मंडळधिकारी , कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले तहसीलदार बोरगावकर यांनी मैत्री घट्ट झाली तर नव्याने रुजू झालेले तहसीलदार गोरे यांचे कार्य चागले आहे असा विश्वास शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ मंडलिक यांनी केले.
तहसीलदार राम बोरगावकर यांनी आपल्या कामात कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्या धन्यवाद व्यक करताना येथील जनतेचे सहकार्य लाभले त्यामुळे खूप काम करता आले असे मनोगतात सांगितले. नूतन तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी कंधार -,उदगीर येथिल किल्ले यांचा साधर्म्य दाखवत तहसीलदार बोरगावकर व आपण चागले गायक आहोत असे सांगून आपले सर्वाचे सहकार्य मिळेल असा आशावाद व्यक्त करत कभी अलविदा ना कहेना हे मंजुळ गळ्यावर गीत गायिले.
यावेळी महसूल संघटनेचे गणेश मोहिजे, नायब तहसीलदार डी डी लोंढे, अनिल परळीकर, उर्मिला कुलकर्णी, ( कंधार) लोहा नायब अशोक मोकले,निवडणूक नायब तहसीलदार संजय भोसीकर, नायब तहसीलदार राजेश पाठक (लोहा) तलाठी संघटनेचे अध्यक्ष मारुती कदम, मनोज जाधव दिलीप मदेवार, मोतीराम पवार, आर्मवार , संतोष चिळकेवार , सुरेश कपाटे, , मंडळ अधिकारी कठारे, तांबरे, मयूर कांबळे, पुजाराणी कुंटुरकर यासह मोठ्या प्रमाणात प्रास्ताविक थोटे यांनी केले यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले, संचनल मन्मथ थोटे आभार नायब तहसीलदार डी डी लोंढे उमटले पाहिजे.