करियरनांदेड

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यशाळा संपन्न

नायगाव, रामप्रसाद चन्नावार। यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व एज्युकेशन सोसायटी नायगाव संचलित जनता हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय नायगाव च्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर जनता कनिष्ठ महाविद्यालय नायगाव येथे एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक चे प्रभारी कुलगुरू डॉ. जोगेंद्र सिंग बिसेन होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कलेपवार, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार विभागीय कार्यालय नांदेड,जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.गणेश देवडे, केंद्र समन्वयक प्रा.गजानन शिंपाळे, सहकेंद्र समन्वयक प्रा. ज्ञानेश्वर बैस उपस्थित होते.

डॉ. जोगेंद्र बिसेन यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल च्या प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य के.जी. सूर्यवंशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उत्तम पाटील यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. पी.डी. जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. नितीन सुजलेगावकर, प्रा.नागप्पा दुड्डे, प्रा. मधुसूदन इंगळे, प्रा. गणेश कुराडे, प्रा. गणेश कदम, प्रा.आर. आर.शिंदे, आनंद गायकवाड यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!