नांदेड| पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण जि. नांदेड हद्दित मोटार सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन मोटार सायकल चोरीचे प्रमाण कमी करुन मोटार सायकल चोराना अटक करुन गुन्हयातील गेला माल मुद्देमाल जप्त करण्यासाठी श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी सदर मोटार सायकल चोरीला आळा घालुन आरोपीतांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील प्रभारी अधिकारी श्रीधर जगताप सहा. पोलीस निरीक्षक, यांनी गुन्हे शोध पथकातील आनंद बिचेवार, पोलीस उप निरीक्षक, पोहेकॉ/1991 वाकडे, पोहेकॉ/492 जाधव, पोहेकॉ/741 मलदोडे, पोना/1812 शेख सत्तार, पोना/2590 मुंडे, पोकों/3376 स्वामी, पोकॉ/170 बेल्लुरोड, पोकॉ/2907 कलंदर, पोकॉ/221 माने, पोकॉ/914 तेजबंद, पोकॉ/1019 दासरे, यांना योग्य त्या सुचना देवुन पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे दाखल असलेला गु.र.नं. 826/2023 कलम 379 भा.दं.वी. मधील चोरीस गेलेली मोटार सायकल व अज्ञात आरोपीचा शोध घेणे बाबत आदेशित केले.
गुन्हे शोध पथकातील प्रमुख व अंमलदार यांनी आपले कौशल्य वापरुन गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नांदेड ग्रामीण पोलीसानी सापळा रचुन आरोपी नामे वैभव गणपतराव पिडगे वय 22 वर्ष व्यवसाय बेकार, रा. अमृतनगर, पुर्णा ता. पुर्णा जि. परभणी यास ताब्यात घेवुन नमुद दाखल गुन्हयासंबंधाने व इतर मोटार सायकल चोरीतील गुन्हयासंबंधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असताना सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबुल करुन सदर गुन्हयातील एक व इतर तीन अशा एकुण चार मोटार सायकल काढुन दिल्या. त्या नांदेड ग्रामीण पोलीसानी जप्त केल्या आहेत.
सदर गुन्हयातील आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या मुददेमालाबाबत व केलेल्या कामगिरीबाबत पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीणचे गुन्हे शोध पथकातील टिमचे श्री. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक साहेब, नांदेड, मा. अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, मा. सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा, नांदेड यांनी अभिनंदन केले आहे.