क्राईमनांदेड

नांदेड पोलीसांची पुन्हा एकदा उल्लेखनिय कामगिरी; गावठी पिस्टलसह 01 जिवंत काडतुस, चाकूसह दोघांना ताब्यात घेतले

नांदेड। श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड आदेशाने रेकॉर्ड वरील पाहिजे, फरारी आरोपीतांचा शोध घेवुन अवैध धंद्यावर कार्यवाही करणे व संशईत हालचालीवर लक्ष ठेवणे करीता आदेशीत केले होते. त्याप्रमाणे सुशीलकुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग इतवारा यांच्या मार्गदर्शन व सुचनेवरुन उपविभाग इतवारा गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार पोना/अर्जुन मुंडे. पोकॉ/ चंद्रकांत स्वामी, संतोष बेल्लुरोड, श्रीराम दासरे दिनांक 14/05/2024 रोजी 15.45 वाजताच्या सुमारास गस्तीवर असताना खबऱ्यामार्फत गोपनिय माहीती मिळाली.

त्यावरून देगलुर नाका नांदेड येथिल कापुस संशोधन केंद्रचे गेट च्या बाजुला सिमेंटच्या नाल्यावर इसम नामे 01. सय्यद अवेस सय्यद खलील वय 24 वर्ष व्यवसाय मजुरी रा. हबीबीया मस्जिद जवळ खुदबे नगर इतवारा नांदेड 02. शेख समीन ऊर्फ अरबाज पि. रौफ वय 23 वर्ष रा. असद मदणी कॉलोनी मदणी मस्जिद जवळ देगलूर नाका नांदेड हे 01 गावठी पिस्टल 01 जिवंत काडतुस 01 तलवार 01 चाकु ताब्यात बाळगुन आहेत अशी माहीती मिळाल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्यांना ताब्यात घेतले.

त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे, ताब्यात विनापरवाना बेकायदेशीर बाळगलेले 01 गावठी पिस्टल 01 जिवंत काडतुस 01 तलवार 01 चाकु असे जप्त केले आहे. यावरुन पोलीस स्टेशन इतवारा गुन्हा नोंद क्रमांक 129/2024 कलम 3/25,4/25 शत्र अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असुन पुढील तपास सपोनि श्री संग्राम जाधव करीत आहेत. सदर कार्यवाही बाबत श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधिक्षक नांदेड, अबिनाश कुमार, अपर पोलीस अधिक्षक नांदेड व ईतर वरिष्ठांनी गुन्हे शोध पथक उपविभाग इतवारा यांचे कौतुक केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!