लोहा। देशाच्या नकाशावर जे काही महत्वाचे लोकसभा मतदार संघ आहेत त्यात नांदेडचा समावेश होतो.या मतदार संघाचे राज्याला चार मुख्यमंत्री दिले. देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, नियोजन मंत्री हे मतदार संघाने डॉ शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने देशाला दिले आहेत. “भीक नको हवे घामाचे दाम “असा संदेश देत ऐंशीच्या दशकात राज्य व देशभरात शेतकरी संघटना उभी करणारे शरद जोशी, रासपचे संस्थापक महादेव जानकर यांनी निवडणूक लढविली १९५२ ते२०१९ या ७३ वर्षात २०खासदार नांदेड लोकसभा मतदारसंघात झाले आहेत.
नांदेड लोकसभा मतदार संघात १९५१ मध्ये शंकरराव टेळकीकर हे नांदेडचे पाहिले खासदार १९५२व १९५७ मध्ये द्विभाषिक राज्यमुळे दोन-दोन खासदार निवडून देण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात राहिलेले हरिहरराव सोनूले हे शेड्युल कास्ट फेडरेशन चे पाहिले खासदार होते.१८ निवडणुका पार पडल्या त्यात २० खासदार मिळाले .७३ वर्षात १५ खासदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले.भजपाचे दोन, शेड्युल कास्ट फेडरेशन , शेतकरी कामगार पक्ष, जनतादल या पक्षाने एक-एक वेळा बाजी मारली.१९५१च्या निवडणूकीत ७लक्ष १०हजार मतदार होते आज १८ हजार ५१ हजार मतदार आहेत.
नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदार संघ आहेत त्यापैकी किनवट, हदगाव हे हिंगोली तर २००९ पासून लोहा विधानसभा क्षेत्र लातूर (अ. जा.) लोकसभग मतदारसंघात आहे नांदेड जिल्ह्यात ३ हजार ४१ मतदान केंद्र आहेत त्यापैकी हदगाव (३१९) किनवट(३३०) ,लोहा( ३३०) हे हिंगोली व लातूर मध्ये आहेत ते नांदेड लोकसभेसाठी २०६२ मतदार केंद्र आहेत.
नांदेड ने चार मुख्यमंत्री दिले
———————————-
नांदेड लोकसभा मतदार संघाचे डॉ शंकरराव चव्हाण यांनी नेतृत्व केले आहे .त्यामुळे हा मतदार संघाचा देशपातळीवर मोजक्या मतदार संघात समावेश होतो.ते राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री होते तर अशोकराव चव्हाण यांनीही नांदेड खासदार म्हणून दोन वेळा नेतृत्व केले .दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते या मतदार संघाचे चार वेळा राज्याला मुख्यमंत्री दिले.
देशाला गृहमंत्री -संरक्षण -अर्थमंत्री देणारा मतदार संघ
——————–
नंदेडकरांना नेहमीच अभिमान वाटावे असे नेतृत्व डॉ शंकरराव चव्हाण यांच्या रूपाने या भूमीत घडले.देशाचे गृहमंत्री ,संरक्षण मंत्री अर्थमंत्री नियोजन मंत्री अशी महत्वाची खाती याच मतदार संघाला मिळाली. सूर्यकांताताई पाटील यांच्या रूपाने पाहिल्या महिला खासदार होण्याचा मान त्यांना मिळाला त्या केंद्रात राज्यमंत्री होत्या पण त्यावेळी हिंगोली चे प्रतिनिधित्व करत होत्या असे असले तरी डॉ शंकरराव चव्हाण यांच्या नंतर या मतदार संघाला केंद्रात मंत्रिपद मिळाले नाही यावेळी तशी संधी दिसते.
भाई धोंडगे -डॉ काबदे – डी बी पाटील चिखलीकर विजयी
—————-
नांदेड लोकसभा मतदार संघात १५ वेळा काँग्रेस पक्ष विजयी झाला पण १९७७-भाई केशवराव धोंडगे(शेकाप), १९८९-डॉ व्यंकटेश काबदे ( जनता दल) , २००४- डी बी पाटील( भाजपा) हे विरोधी पक्षाचे उमेदवार निवडून आले तर २०१९ मध्ये भजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष याचा पराभव करत राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतले.
ऍड प्रकाश आंबेडकर “पराभूत
——————–
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र भैयासाहेब आंबेडकर (१९७१) नातू ऍड प्रकाश आंबेडकर (१९८७) तसेच अशोकआंबेडकर यांचे चिरंजीव राजरत्न आंबेडकर (२०१४) यांनी नांदेड लोकसभा लढविली आणि ते पराभूत झाले.त्यांना काँग्रेसनेच हरविले.
शिवसेना एकदा – भाजपा आठ वेळा
————————–
शिवसेना-भाजप अशी युती होती १९९१ मध्ये नांदेड लोकसभा शिवसेनेने लढविली त्यानंतर १९९६, १९९८, ते २०२४ असा सलग आठ निवडणूक भाजपने लढविल्या त्यात दोन वेळा त्यांना विजय मिळाला आहे.
खासदार झाले अन दोन वेळा पराभूत सुद्धा
———————–
नांदेड लोकसभा निवडणुकीत १९८९ मध्ये डॉ व्यंकटेश काबदे (२ लक्ष ७८हजार ३२०) जनता दलाचे लाटेत विजयी झाले पण त्यानंतर १९९१ मध्ये त्यांना केवळ ८१ हजार ५२ मते मिळवत तिसऱ्या स्थानावर राहिले तर १९९८मध्ये त्यांना फक्त११ हजार ३६०मते मिळाली ते पाचव्या क्रमांकावर होते खासदार ते दोन वेळा पराभूत असा त्याचा राजकीय प्रवास राहिला
शरद जोशी ,महादेव जानकर सुरेश गायकवाड हरले
याच मतदार संघात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी १९९६ मध्ये उभे होते त्यांना ७१ हजार मते मिळाली.१९९८ मध्ये महादेव जानकर( १९ हजार मते) १९९८ शंकर अण्णा धोंडगे (३४ हजार४०४ मते), १९९९-गुणवंत पाटील हंगरगेकर (स्वतंत्र भारत पक्ष) २००४-सुरेश दादा गायकवाड( भारिप) २००९-मकबूल सलीम( बीएसपी) २०१४-राजरत्न आंबेडकर( बहुजन मुक्ती पार्टी) २०१९-डॉ यशपाल भिंगे याना हार पत्करावी लागली.
●अनंत मामडे पाच वेळा रिंगणात
कंधार येथील स्वातंत्र्य सैनिक अनंत मामडे हे लोकसभा व कंधार विधानसभा निवडणुक लढवायचे त्यांनी नांदेड लोकसभा मतदार संघात १९८०, १९८४, १९८९, १९९१ ,१९९६ असा पाच निवडणूका लढविल्या पण त्यांना १९९६च्या लोकसभेत ३५हजार ५३१ मते मिळाली.त्याचे कारण असे की, या वर्षी शरद जोशी हे रिंगणात होते त्याच्या जनता पक्षाचे चिन्ह नांगर होते तर अनंत मामडे यांचे “नांगरधरी शेतकरी “हे निवडणूक चिन्ह होते त्यामुळे चिन्हातील साधर्म्य असल्यामुळे त्यांना अधिकची मते मिळावी त्याकाळी हे खूप गाजले असा काही आगळ्या वेगळ्या ओळखीचा हा नांदेड मतदार संघ होय .