क्रीडानांदेड

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयद्वारा आयोजीत विभागस्तरीय युवा महोत्सवात नांदेडचे वर्चस्व

नांदेड| डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह व स्टेडियम परिसरात संपन्न झालेल्या विभाग स्तरीय युवा महोत्सवात नांदेडने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय व कृषि विभाग नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 8 व 9 डिसेंबर रोजी हा युवा महोत्सव संपन्न झाला.

क्रीडा व युवक सेवा लातूर विभागाचे उपसंचालक जगन्नाथ लकडे, राज्य निवडणूक दुत डॉ. सान्वी जेठवाणी, नेहरू युवा केंद्राच्या चंदा रावळकर, कविता जोशी, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, राज्य क्रीडा मार्गदर्शक बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, संतोष कनकावार, प्रांजली रावणगावकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

विभागीय युवा महोत्सवातील हे आहेत विजेते – सांस्कृतीक (समुह लोकनृत्य) – प्रथम- अखिल भारतीय मराठी नाटय परिषद, धाराशिव, द्वितीय- दयानंद वाणिज्य महा. लातूर, तृतीय- ओझोन फाऊंडेशन, किनवट जि.नांदेड, (वैयक्तीक सोलो लोकनृत्य)- प्रथम- आदिती केंद्रे (नांदेड), द्वितीय- अर्पणा पवार, (लोकगीत समूह)- प्रथम- कलाधिराज सांस्कृतिक कला संघ, लातूर, द्वितीय- शिव बहुउददेशिय सेवाभावी संस्था, हदगाव जि.नांदेड, तृतीय- धनंजय शिंगोडे संस्था, धाराशिव, (वैयक्तिक सोलो लोकगीत)- शिवकुमार मठपती (नांदेड), द्वितीय- अपेक्षा डाके.

कौशल्य विकास (कथा लेखन )- प्रथम- रितेश पडोळे, द्वितीय- आदित्य भांगे, 3) शिवप्रसाद भोळे, (पोस्टर स्पर्धा)- प्रथम- प्रतिक्षा हळदे, द्वितीय- सुरेश गवाले, तृतीय- जगदीश सुतार, (वकृत्व स्पर्धा इंग्रजी व हिंदी)- अंकिता ढगे, द्वितीय- अक्षरा मोरे, तृतिय- समीर शेख (धाराशिव), (फोटोग्राफी)- प्रथम- रमेश गायकवाड (नांदेड), द्वितीय- प्रसाद शिंदे.

संकल्पना आधारीत स्पर्धा 1) तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर- प्रथम – शुभांगी संजय जावळे, द्वितीय- नेताजी सुभाषचंद्र बोस महा.नांदेड 2) सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान- प्रथम- हनुमंत पांचाळ, द्वितीय- आकांक्षा दांडगे, तृतीय– आसावरी संतोष भोसीकर 4) युवा कृती (हस्तकला)- प्रथम- रमेश एकनाथ गायकवाड, (वस्त्रउद्योग)- प्रथम- रमेश एकनाथ गायकवाड, (अग्रो प्रोडक्ट)- जितेंद्र सुधाकर रुद्रकंठवार, द्वितीय- शेख लईख शेख बाबु, तृतीय- प्रसाद नवनाथ गवाले. या विभागीय युवा महोत्सवाकरीता विविध कलाप्रकाराचे परिक्षक म्हणुन डॉ. सान्वी जेठवाणी, प्रा. संदीप काळे, डॉ. पांडुरंग पांचाळ, प्रा. पंकज खेडकर, डॉ. संदेश हटकर, प्रा. शुभम बिरकुरे, प्रा. शिवराज शिंदे, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, श्रीमती कविता जोशी, डॉ. सिध्दार्थ नागठाणकर, कविता जोशी, जाहीर उमेर, डॉ. पुरण शेटटीवार, डॉ. बालाजी पेनुरकर, डॉ. मनिष देशपांडे आदींनी काम पाहिले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा कार्यासन बालाजी शिरसीकर, चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी संजय बेतीवार, प्रवीण कोंडेकर, वरिष्ठ लिपीक संतोष कनकावार, व्यवस्थापक संजय चव्हाण, आनंद जोंधळे, हनमंत नरवाडे, आकाश भोरे, बंटी सोनसळे, वैभव दमकोंडवार, उत्तम कांबळे, मोहन पवार, सुभाष धोंगडे, चंद्रकांत गव्हाणे, सोनबा ओव्हाळ, ज्ञानेश्वर रोठेआदींनी परिश्रम घेतले असल्याचे मा.जिल्हा क्रीडा अधिकारी,नांदेड यांनी कळविले आहे. विजेते स्पर्धक क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे येथे संपन्न होणाऱ्या राज्यस्तरीय युवा महोत्सवात लातूर विभागाचे प्रतिनिधीत्व करणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी सांगितले. 

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!