करियरनांदेड

नगरपरिषद आणि जिल्हा परिषद गट-क सरळसेवा परीक्षा-२०२३ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड| नांदेड जिल्हा परिषद गट-क सरळसेवा पदभरती परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत.

या आदेशात नमूद केलेल्या आरजीसी हायटेक डिजीटल झोन नांदेड द्वारा राजीव गांधी कॉलेज कॅम्पस, विद्युत नगर नांदेड, होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल, लातूर रोड, नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर नांदला, दिग्रस, खडकूत या 3 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 23 नोव्हेंबर 2023 रोजी तीन सत्रात ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षा-२०२३ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
महाराष्ट्र नगरपरिषद गट-क परीक्षा-2023 च्या परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये जिल्हादंडाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमीत केले आहेत. या आदेशात नमूद केलेल्या होरिझोन इंटरनॅशनल सीबीएसई स्कूल नांदेड लातूर रोड विष्णुपुरी नांदेड, राजीव गांधी कॉलेज कॅम्पस विद्युत नगर नांदेड, श्री संभाजी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड टेक्नालॉजी नांदेड शामल एज्युकेशन कॅम्पस देगाव रोड समोर नांदला, दिग्रस, खडकूत या 3 परीक्षा केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरात 22 नोव्हेंबर व 24 नोव्हेंबर 2023 रोजी तीन सत्रात घेण्यात येणार आहे. सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंतच्‍या वेळेत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधीत असलेले अधिकारी-कर्मचारी या व्यतिरीक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. तसेच या दर्शविलेल्या वेळात परीक्षा केंद्राच्या परिसरातील 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स / एस.टी.डी./ आय.एस.डी/ भ्रमणध्वनी/पेजर/ फॅक्स/झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास या आदेशाद्वारे प्रतिबंध करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!