माहूर, इलियास बावानी| माहूर येथील जिल्हा परिषद उर्दू माध्यम शाळेत कार्यरत असलेले शिक्षक मोहम्मद युनूस मोहम्मद युसुफ यांना गालिब अकादमी, दिल्ली येथे आयोजित भव्य सोहळ्यात राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

कौमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ (इंडिया रजि.) यांच्या वतीने ५ सप्टेंबर २०२५, शिक्षक दिनाच्या औचित्यावर हा कार्यक्रम चौधरी वसील अली गुर्जर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. या प्रसंगी देशभरातील विविध राज्यांतील उर्दू शिक्षक, प्राध्यापक, उर्दू कर्मधारी तसेच उर्दू भाषा व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले.

यात माहूरचे शिक्षक मोहम्मद युनूस यांना देखील त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या राष्ट्रीय गौरवामुळे माहूर परिसरात समाधान व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नगराध्यक्ष फिरोज दोसानी, नगरसेवक प्रतिनिधी इरफान सय्यद, अपसर आली, निसार कुरेशी, रफिक सौदागर, गट शिक्षण अधिकारी संतोष शेटकार, गट समन्वयक संजय खडकेकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अपील बेलखोडे, मुख्याध्यापक संजीव वाठोरे यांनी मोहम्मद युनूस यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
उर्दू भाषेचा प्रचार-प्रसार करणे, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्याचा हेतू या पुरस्कारामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले.
