करियरसोशल वर्क

रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावच्या वतीने कु. पायल चव्हाण या अनाथ मुलींस मदत

हिमायतनगर| हिमायतनगर तालुक्यातील मौजे कोकातांडा जि. नांदेड येथील कु. पायल कैलास चव्हाण या अनाथ मुलींस तिच्या घरी जाऊन रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावच्या वतीने मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहन दानशूर दात्यांनी सढळ हाताने मदत करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यातून जमा झालेली एकूण रक्कम 26 हजार 254 रुपये कु. पायल या अनाथ मुलींस फोन पे नंबर वर घरी जाऊन दिली गेली. यावेळी कोकातांडा येथील कार्यकर्ते प्रकाशराव जाधव, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष जाधव, नारायणराव राठोड, कुमारी राणी जाधव, कुमारी प्रियतमा राठोड, कोका तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षक श्री राजेश धरमुरे सर जवळगावकर, संतोष चव्हाण सर कनकवाडीकर, तांडा येथील माता भगिनी नागरिक उपस्थित होते.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगावच्या आव्हानास श्रीमान प्रवीण दीक्षित साहेब DGP सेवानिवृत्त न्यायाधीश मुंबई यांनी पुढील साडेतीन वर्षाची लागणारी कॉलेजची व हॉस्टेलची संपूर्ण फीस भरण्याचे वचन दिले आहे. ही माहिती डॉक्टर श्रीमान दतराम राठोड साहेब उपमहासंचालक मुंबई यांनी दिली. तसेच पोहरा देवी येथील महंत श्री केशव महाराज यांनी सुद्धा पायालला मदत करण्याचे वचन दिले, मुर्तीजापुर विधानसभेचे सन्माननीय आमदार श्री. हरीश भाऊ पिंपळे साहेब यांनी पाच हजार एक रुपये मदत पायलला केली आहे.

सर्व दानशूर दात्यांचे रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव संस्थापक अध्यक्ष सटवाजी पवार जवळगावकर यांनीआभार व्यक्त केले. तसेच अश्याच प्रकारचे सहकार्य सामाजिक कार्यासाठी भविष्यात सुद्धा असावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ही मदत दिलेली बघून पायलची आई, बहीण,भाऊ, मामा,मामी, आजी, आजोबा, या कुटुंबाला आनंद अश्रू आवरता आले नाही. पायलची आई ढसाढसा रडत होती. रयत सेवाभावी प्रतिष्ठान जवळगाव हे माझ्यासाठी देवदूत बनवून आले अशी भावना त्या आईने, आजी-आजोबांनी मामा-मामींनी पायलने व्यक्त केली. कुमारी पायल कैलास चव्हाण तिची परिस्थिती कोका तांडा येथील शिक्षक श्री राजेश धरमुरे सर जळगावकर यांनी रयत सेवाभावी प्रतिष्ठानला कळवली होती.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!