लोहा। दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लोहा शहरात दिवाळी पाडवा निमित्ताने मोंढा परिसरात व्यापाऱ्याना भेटून त्याना दिवाळीच्या शुभेच्छा बदल्या .गेल्या 20बवर्षा पासून न चुकता या दिवशी प्रतापराव हे लोह्यात येतात व व्यापाऱ्यांना भेटतात.
दिवाळी पाडवा या दिवशी लोह्याच्या मोंढा भागात व्यापाऱ्याच्या दुकानावर जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेऊन खा प्रतापराव पाटील चिखलीकर हे शुभेच्छा देतात.पदावर असो अथवा नसो त्याचे व्यापाऱ्याशी असलेले अतूट व प्रेमाचे नाते गेल्या वीस -तीस वर्षा पासून कायम आहे.
मार्केट कमिटी निवडणुकीत मागील महिन्यात पराभव झाला पण तो बाजूला सारून प्रतापराव व त्याचे सहकारी दिवाळी पाडवा निमित्ताने लोहयातील मोंढा व मुख्य रस्त्यावरील व्यापाऱ्याकडे जाऊन त्यांनी दुकानास भेट दिली व शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माणिकराव मुकदम ,विधानसभा अध्यक्ष प्रवीण पाटील चिखलीकर, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम ,उपनगराध्यक्ष दता वाले , माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, गटनेते रिम शेख,नगरसेवक भास्कर पाटील, माजी उपसभापती बालाजी पाटील कदम, माजी उपनगराध्यक्ष रामराव सूर्यवंशी ,माजी कृउबा उपसभापती मारुती पाटील बोरगावकर, माजी सभापती खुशाल पाटील पांगरिकर, , माधव पाटील बोरगावकर, भाजपा प्रदेश सचिव अनिल पाटील बाभळीकर, राजेश मोरे , व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव, शिवसेना तालुका प्रमुख मिलिंद पवार, माधव कटकमवार , दीपक पाटील, सचिन मुकदम, इमाम बेरळीकर, माजी उपसभापती नरेंद्र गायकवाड, यासह मोठ्या संख्येनी कार्यकर्ते उपस्थित होते.