नांदेडसोशल वर्क

AMS(क्यू आर कोड) विरोधात आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी व महाराष्ट्र राज्य शिक्षक मध्यवर्ती संघटनेचि बैठक संपन्न

नांदेड| जिल्हयामधे लागु करण्यात येत असलेल्या AMS QR कोड संदर्भात जिल्हयात कार्यरत ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी संघटना,महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना व आरोग्य कर्मचारी संघटनांची संयुक्त बैठक नुकतीच नांदेड येथे संपन्न झाली

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यवाह तथा मध्यवर्ती संघटनेचे निमंत्रक मधुकर उन्हाळे तर प्रमुख उपस्थीतीमधे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे,आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्यसचिव तथा बैठकीचे निमंत्रक दिनानाथ जोंधळे,राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड,मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी एम पांडागळे हे होते. या बैठकीत नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत सर्व तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारी,शिक्षकांसाठी AMS QR कोड प्रणाली अर्थात ऑनलाईन उपस्थिती नोंदविण्यासाठी एका खाजगी एजन्सी मार्फत ॲप डेव्हलपमेंट करण्यात आलेले आहे. याॲपच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांना आपली उपस्थिती कार्यालयात, दवाखान्यात, शाळेत आल्यावर नोंदवावयाची आहे,आणि जाताना सुद्धा सेल्फी काढून नोंद करावयाची आहे. असा निर्णय जिल्हास्तरावर जि.प.प्रशासनाने घेतलेला आहे या कार्यपद्धतीस जिल्ह्यातील सर्वच संघटनांनी विरोध दर्शविलेला असून सुद्धा प्रशासन हा निर्णय कर्मचाऱ्यावर लादल्या जात आहे.

महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया चालू नसताना किंबहुना शासनाचा कुठलाही आदेश नसताना जिल्हास्तरावर उपक्रम राबविण्याच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे.असी चर्चा जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. या संदर्भात नांदेड येथे नुकतीच सर्व संवर्गांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.संघटनांनी प्रशासनाला ही प्रणाली लागू करण्यात येऊ नये म्हणून निवेदन सुद्धा दिलेले आहेत परंतु प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आलेली आहे. क्यू आर कोड प्रणालीमुळे आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न दिसून येत आहे,या प्रणालीमुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या व्यक्तीगत स्वातंत्र्यावर बंधने लादल्या जावु शकतात.त्याच बरोबर आपला मोबाईल मधील सर्व डाटा हॅक होण्याची व संबंधित कंपनीला जाण्याची भीती शिक्षक /कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

प्रशासनाची सर्व प्रशासकीय/पर्यवेक्षीय यंत्रणा आपापल्या अधिनस्त कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवत असताना सुद्धा या प्रणालीची आवश्यकता का भासली ? असाही प्रश्न निर्माण होत आहे.जर कर्मचाऱ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवायची असेल तर सर्व कार्यालयामध्ये बायोमेट्रिक यंत्रणा बसून ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्यात यावी.असी मागणी यावेळी करण्यात आली.यासाठी अगोदर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत,शाळा,आरोग्य केंद्रे,उपकेंद्रे यांना इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून द्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आपल्या परवानगी शिवाय आपल्या मोबाईलचा वापर करता येत नाही त्याशिवाय अनेक शिक्षक/कर्मचांऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नाहीत,तसेच आजही ग्रामीण भागामध्ये इंटरनेटची सुविधा बऱ्याचशा प्रमाणात उपलब्ध नाही त्यामुळे क्यू आर.कोड वापरताना येणाऱ्या अडचणी,त्याचे दुष्परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली आणि पुढची दिशा ठरविण्यात आली.

त्या अनुषंगाने सर्व संवर्गाच्या संघटनांच्या वतीने दिनांक 18 जानेवारी गुरुवार रोजी सायंकाळी 4-00 वा. जि.प.प्रशासनाला AMS QR प्रणाली राबविण्याच्या विरोधा मध्ये संयुक्त निवेदन देण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना,ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी संघटना,आरोग्य संघटना,तसेच जि.प.कार्यक्षेत्रात कार्यरत सर्वच संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात उदया दि.18 जाने.गुरूवारी दु.4-00 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी मधुकर उन्हाळे,धनजंय वडजे,दिनानाथ जोंधळे,डी. एम.पांडागळे,चंद्रकांत कुणके,दिगंबर मांजरमकर,एल बी चव्हाण,रवि ढगे सह सर्वानी आपले मत मांडले.

बैठकीस शिक्षक नेते मधुकर उन्हाळे,ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय वडजे,अनु जातीजमाती/विजभज/ इमाप्र/विमाप्र अधिकारी /कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव दिनानाथ जोंधळे,राष्ट्रसेवा आरोग्य संघटनेचे राज्याध्यक्ष पुष्पराज राठोड,मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी एम पांडागळे,जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कुणके,कास्ट्राईब आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत शिरसे,म.रा.जिल्हा परीषद नर्सेस संघटनेच्या राज्य सचिव एस.जी.शिरुळे,CHO कंधार डॉ.सुर्यकांत खतगावकर,समुदाय आरोग्य संघटनेचे सहसचिव CHO भरतभुषण गजभे,अनू जाती/जमाती मत्रालयीन आरोग्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल वाघमारे,जि.प.माध्यमीक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर मांजरमकर,शिक्षक भारती माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष संजय शेळगे,कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एल बी चव्हाण,सहकार शिक्षक संघटनेचे विभागीय अध्यक्ष रवी ढगे,एल ए गादगे,मध्यवर्ती शिक्षक संघटनेचे रमेश घुमलवाड, किरण गोईनवाड,विठ्ठल मुखेडकर,सह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!