नांदेड| जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात मोठा नावलौकिक मिळविलेल्या सहयोग कॅम्पसच्या इंदिरा इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस मध्ये एमबीएच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचा स्वागत समारोह कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन इंदिरा इन्स्टिटयुट मॅनेजमेंट सायन्सेस चे डायरेक्टर डॉ. प्रकाश निहलानी, प्रमुख आतिथी म्हणुन मदर टेरेसा नर्सिंग स्कुल चे प्राचार्य सुनील पांचाळ उपस्थित होते.
यावेळी इंदिरा इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस चे प्रभारी संचालिका डॉ. गजला खान, बीसीएचे प्राचार्य श्री. सुनील हंबर्डे, विभाग प्रमुख अतुल कटारे, कृष्णा पदमवार, समता सोनकांबळे, शिवानी देशमुख व तसेच बीसीएचे विभाग प्रमुख राजेश क्षिरसागर, अभिजीत आळंदकर, सुनील खंटीग, संपदा मामीडवार, अंजली राठोड, माधव कल्याणकर, अक्षय सुरनर, सुरेश पावडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलनकर्ते अक्षय चव्हाण व तेजस्वीनी नागापुरकर यांनी केले.
सर्व विद्यार्थ्यानी कार्यक्रमास मोठया संख्येने सहभाग नोंदवला, प्राचार्य सुनील पांचाळ यांनी एमबी नंतर भविष्यात उपलब्ध असणा-या संधीबददल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांचे संवाद साधताना प्राचार्य सुनील पांचाळ म्हणाले की, एमबीएचे शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना निश्चितपणे नोकरीची संधी उपलब्ध होते. परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये करियर करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतः त आत्मविश्वास निर्माण करणे आवश्यक आहे. आत्मभाण ठेवणे आवश्यक आहे .आपल्या पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून यश मिळविण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी कष्ट उपसावे लागतील . त्यामुळे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी यश हमखास मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.