नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ ऊमरदरी संचलित, नरसिंह विघा मंदीर येथे अकालीक मुल्यमापन वार्षिक परिक्षा अंतर्गत अभ्यासक्रमावर आधारित प्रकल्प प्रदर्शनाचे उदघाटन १९ जानेवारी रोजी नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी जवळपास ६०० प्रकल्प सादरीकरण करण्यात आले यावेळी विधार्थी मध्ये ऊत्साहाचे वातावरण दिसून आले.
नरसिंह विघामंदीर प्राथमिक शाळा सिडको येथे ६०० विधार्थी यांच्या प्रयत्नातुन विविध प्रकल्प सादर करण्यात आले या प्रदर्शनाचे उदघाटन नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर, पत्रकार संभाजी सोनकांबळे,छायाचित्रकार सांरग नेरलकर व मुख्याध्यापक अकुलवार यांच्यी उपस्थिती होती.
यावेळी अयोध्या राममंदिर, छत्रपती शिवाजी महाराज किल्ला, चंद्रयाण, वाहतूक नियम देखावा, थोर पुरुषाचे साकारले पेन्सील व्दारे काढलेले प्रतिक आकले यांनी काढलेले छायाचित्र, मुखवटे,विवीध प्रकाराचा घडयाळी , बेरीज वजाबाकी दर्शविणारे प्रकल्प,पारंपारिक सण व जुन्या काळात वापरण्यात येणारे अवजारे,खेळणी, पशुपक्षी चित्र प्रदर्शन यांच्या समावेश होता.
मुख्याध्यापक श्रीमती अकुलवार व्ही. ए,संगेवार एस.आर,श्रीमती मामडे व्ही.एन.वाडेकर पि.के.श्रीमती पोहरे व्ही.एन,श्रीमती झाडे एल. बी, श्रीमती वाघमारे एम.व्ही. क्षिरसागरजि.बी,चौवुलर एम. बी. कोनापुरे डी. व्ही, बसवदे जि. टी. यादव के.व्ही.सिंगणवाड व्ही.व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली विधार्थीनी आपल्या कलातुन सादरीकरण केले. प्रदर्शन पाहण्यासाठी माध्यमिक व प्राथमिक शाळेतील पालकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.