नांदेड| दैनिक प्रजावाणीचे भोकर तालुका प्रतिनिधी तथा राजपूत समाजाचे युवा कार्यकर्ते मनोजसिंह चौहान यांची करणी सेनेच्या नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
हि निवड संभाजीनगर येथील प्रदेशाध्यक्ष देवीचंदसिंह बारवाल यांच्या हस्ते मनोजसिंह चौहान नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी मराठवाडा युवाध्यक्ष जगतसिंह राजपूत, नांदेड जिल्हाध्यक्ष शैलेंद्रसिंह ठाकुर, संभाजीनगर शहराध्यक्ष चरणसिंह राजपूत,शहर उपाध्यक्ष निलेश पवार,सिल्लोड शहराध्यक्ष नारायण राजपूत ,धम्मा कांबळे, सुरेश लंगडापुरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या निवडीबद्दल मनोजसिंह चौहान यांचे अनेकांनी अभिनंदन केले असून, पुढील समाज कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.