नायगाव, रामप्रसाद चन्नावार। रब्बी हंगामाकडे आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांना निम्न मानार प्रकल्प कंधार फेब्रुवारी 2024 पर्यत पाण्याची आवर्तने जाहीर करुन नांदेड पाटबंधारे मंडळाने मोठा दिलासा दिला आहे. या नियोजनानुसार सन 2023-24 च्या रब्बी हंगामासाठी सिंचन आवर्तन पाणीपाळयाचे नियोजन जाहीर केले आहे.
निम्न मानार प्रकल्प ता. कंधार साठी एकूण 3 आवर्तन डावा व उजवा कालव्यासाठी सोडण्यात येणार आहेत. पहिले आर्वतन 25 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर 2023 या कालावधीत तर दुसरे आर्वतन 30 डिसेंबर 2023 ते 13 जानेवारी 2024 या कालावधीत तर तीसरे आर्वतन 29 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सोडण्यात येणार आहे. पहिले आर्वतन 20 दिवसांसाठी तर दुसरे व तीसरे आवर्तन अनुक्रम 15 दिवसांसाठी राहील.
रब्बी हंगामात प्रथम पाणीपाळी मध्ये प्रथमत: सिंचनासाठी मा.गो.शा.का. क्र. 1 व 2 साठी 12 दिवस चालू राहील. मानार डावा कालवा 8 दिवस चालू राहील. अशी एकूण 20 दिवसाची पहिली पाणी पाळी राहील. दुसऱ्या व तिसऱ्या पाणीपाळी मध्ये प्रथमत:
सिंचनासाठी मा. गो.शा.का.क्रं. 1 व 2 साठी 9 दिवस चालू राहील. मानार डावा कालवा 6 दिवस अशी एकूण 15 दिवसाची दुसरी व तीसरी पाणीपाळी राहील.