नांदेड| शहराच्या मगनपुरा भागातील मालपाणी मतिमंद व मुकबधिर विद्यालयात शुक्रवार दि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे जनसंपर्क मंत्री श्री ओमप्रकाश तापडीया यांच्या हस्ते ध्वजारोहण तर उद्योगपती रमेश डागा यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रारंभी मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत केले.
ध्वजारोहणापूर्वी राजस्थानी एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सदस्य रामेश्वरजी कोठारी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी मुख्याध्यापक निर्मल यांनी देशाचे संविधान, प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजीच का साजरा केला जातो याबाबत माहिती उपस्थित विद्यार्थ्यांना दिली. यावेळी चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले तसेच गरीब व होतकरु मतिमंद विद्यार्थिनीला ड्रेसचे वाटप करण्यात आले. विद्यालयातील मतिमंद व मुकबधिर विद्यार्थ्याना विद्यालयातील माजी विद्यार्थी पिलगुंडे, गणेश कोकाटे, लॉयंस क्लब एंजल यांच्या वतीने अल्पोपहार तर मुकेश ठक्कर यांच्या तर्फे वॉटरबॉटल चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश गिल्डा, सचिव प्रकाश मालपाणी, सहसचिव डॉ. लक्ष्मीकांत बजाज, जेष्ठ सदस्य बनारसीदासजी अग्रवाल, डॉ. सुरेश दागडीया, अॅड. चिरंजीलाल दागडीया, बद्रीनारायण मंत्री, संजय बजाज, अरुण तोष्णीवाल, शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी व पालक, उपस्थित होते. संस्थेच्या वतीने सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.