नांदेड,अनिल मादसवार| भारतीय जनता पार्टीच्या सैरावैरा झालेल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित करून आज आढावा बैठक घेतली आहे. यामध्ये बाबुराव कदम कोहळीकर याना निवडून आणण्यासाठी आपसातील नाराजी दूर ठेऊन सर्वानी एकदिलाने काम करावं आणि भाजपच्या चारसो (400) पार या उद्देशाला पूर्ण करून भारत देशाला आणखी उंच शिखरावर नेण्यासाठी तिसऱ्यांदा नरेंद्रभाई मोदी याना पंतप्रधान करावंच लागेल. यासाठी लहान्यापासुन सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी याना रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागेल. असा संदेश माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
त्या हदगाव येथे आयोजित आढावा बैठकी प्रसंगी पत्रकारांशी बोलत होत्या. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, हदगाव हिमायतनगर तालुक्यात मी ४५ वर्षपासून काम करते आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे. सध्या माझे लक्ष लोकसभेच्या उमेदवारास निवडून आणणे आहे. विधानसभा आणखी खूप दूर आहे, पहिल्यांदा बाबुराव कोहळीकर याना लोकसभेत पाठवू, त्यानंतर विधानसभेची निवडणूक हि शेवटची म्हणून लढवायची आहे. या तालुक्यातील सर्व माणसे माझी आहेत. या तालुक्याला मी वाऱ्यावर सोडणार नाही. माझ्या कार्यकाळात जे काही विकास कामे झाली त्यापेक्षा जास्तीची काहीच सुधारणा झाली नाही. तालुक्यातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आत्ता झालेल्या बैठकीपासून मी विधानसभेच्या क्षेत्रांत लक्ष घालणार आहे. मी हदगाव- हिमायतनगर मतदार सांघट प्रत्यक्ष प्रमुख लोकांशी भेटून रात्रंदिवस एक करून मतदार फिरणार आहे आणि बाबुराव कदम कोहळीकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
हदगाव येथे हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीची आढावा बैठक देशाच्या माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्रीमती सूर्यकांताताई पाटील व जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाली. हिंगोली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार हदगाव हिमायतनगर तालुक्यात झंजावातपणे करून हदगाव व हिमायतनगर विधानसभेमधून एक लाखाची लीड देण्याच्या संकल्प उपस्थित बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख युवा वॉरियर्स प्रमुख पदाधिकारी यांनी केला.
या बैठकीला प्रदेश कार्यकारणी सदस्य शेखर पाटील कोळीकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर जिल्हा सचिव आशिषभाऊ सकवान, भाजपा नेते किशनराव पाटील वानखेडे, किसान मोर्चाचे रावसाहेब देशमुख, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष भागवत देवसरकर, व्यंकटेश लोणे, माजी सरपंच सुप्रिया मुनेश्वर, माजी सरपंच लोणेताई, तालुकाध्यक्ष रूपाताई पाटील, डी बी पाटील पारवेकर, ओबीसी तालुकाध्यक्ष राम पाकलवार, भाजपाचे माजी अध्यक्ष निळू पाटील, तालुकाध्यक्ष तातेराव वाकोडे, माजी अध्यक्ष तुकाराम चव्हाण, माजी शहराध्यक्ष बाळा पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष साई बाबुळकर, सरपंच जीवन जैस्वाल, ज्ञानेश्वर शेवाळे सुभाष माने, प्रमोद शिरफुले, वामन पाटील, परमेश्वर सूर्यवंशी, विनायक ढोणे, अमोल माने, बालाजी ढोणे, विनोद दुर्गेकर, विकास भूसावळे, कोंडबा कदम, लक्ष्मण चव्हाण, यांच्या सहित सर्व सर्कल प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख बूथ प्रमुख युवा वॉरियर्स प्रमुख पदाधिकारी महिला मोर्चाच्या पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.