नवीन नांदेड। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या मार्फत नांदेड तहसील कार्यालयाचा वतीने करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणासाठी पाहणी करण्यासाठी तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी वाघाळा, गोपाळ चावडी सज्जा अंतर्गत पर्यवेक्षक ,प्रगणक यांची पाहणी केली व मार्गदर्शन केले.
नांदेड तहसील कार्यालय यांच्या वतीने मागासवर्ग सर्वेक्षणाचे काम नांदेड तालुक्यात अनेक ९६ टक्के काम पूर्ण झाले असून एकूण ३७हजार २०० कुटूंबाचे काम १ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण झाले आहे यावेळी वसरणीचे मंडळ अधिकारी अनिल धुळगंडे, सूजलेगावकर, तलाठी चंद्रकांत कंगळे, तलाठी कविता इंगळे यांच्या सह प्रशासकीय अधिकारी यांनी गोपाळ चावडी येथे भेट देऊन पाहणी केली. धनेगाव, बळीरामपूर गोपाळ चावडी, बाभुळगाव,वाघाळा सिडको तुप्पा येथे भेट दिली आहे. २ फेब्रुवारी रोजी सर्वक्षण १००/ टक्के पुर्ण होणार असल्याचे यावेळी दिगलवार यांनी सांगितले.