नांदेड| काचीगुडाहून नांदेडला येताना तिरुपती ते अकोला रेल्वेतून चोरट्यांनी महागडा लॅपटॉप व बॅग लंपास केल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी तक्रारदाराने नांदेड जीआरपी पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.हे प्रकरण तपासासाठी निजामाबाद जीआरपी ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
श्रद्धा श्रीहरी कुलकर्णी या मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नोकरीस असून त्या, पती व सासूबाईसह दि. २४ फेब्रुवारी रोजी रेल्वे क्रमांक ०७६०५ तिरुपती ते अकोला गाडीने काचीगुडाहून नांदेडकडे येत होत्या. एस ६ डब्यातील बर्थ क्रमांक १,७ व ८ मध्ये त्यांचे आरक्षण होते.प्रवासादरम्यान सफारी कंपनीची ट्रॉली बॅग होती. कंपनीने कामासाठी लॅपटॉप दिला होता. (ऌढ २१. ल्लङ्म 5उॠ2139ेऌछ, मालमत्ता टॅग – 14679308) अंदाजे पावणे दोन लाखांहून अधिक किमतीचा लॅपटॉप, कपडे व अन्य ऐवज या बॅगमध्ये होता. दि. २४ रोजी सकाळी ८.३० वाजता श्रध्दा व सहकाऱ्यांना जाग आली तेव्हा बासर रेल्वेस्थानक आले होते. तेव्हा त्यांनी बॅग शोधली असता आढळून आली नाही. श्रध्दा यांचे पती सकाळी ७ वाजता वॉशरुम फे्रश होण्यासाठी उठले होते.
तेव्हा त्यांना बॅगच्या पलिकडे अंगावर शाल पांघरलेला आणि संशयास्पद हालचाल असलेली व्यक्ती बसली होती हे श्रध्दाच्या पतीने पाहिले होते. आमची बॅग ही त्या संशयित व्यक्तीनेच चोरुन नेल्याचा आमचा संशय आहे.हा इसम ४०.४५ वर्षांचा असून दाढी, उंची अंदाजे ५ फुट १० इंच असावी. या प्रकरणी श्रध्दा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नांदेड रेल्वे स्थानकावर गुरनं १९४/२४ कलम ३७९ आहे. हा गुन्हा नांदेडमध्ये नोंदवून तपासासाठी निजामाबाद रेल्वे पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.