क्राईमनांदेड

स्थानीक गुन्हे शाखेने दोन आरोपीतांकडुन केल्या १७ घरफोड्या उघड; स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई

नांदेड| जिल्हयात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री दत्तात्रय काळे यांची टिम तयार करुन नदिड शहरातील घरफोडी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोउपनि दत्तात्रय काळे व टिम यांनी घरफोड्या झालेल्या विवीध ठिकाणची माहीती हस्तगत फरून त्याचे विश्लेषन फरुन तसेच गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन नांदेड शहरात मोठया प्रमाणे घरफोडी करणारे 1. संजय दत्ता गुंडेवार यय 33 वर्षे व्यवसाय मजुरी रा. नंदीग्राम सोसायटी नांदेड,  व्यंकटेश उत्तमराय तिडके यय 33 वर्षे व्यवसाय मजुरी रा. बोडार ता. जि. नांदेड ह.मु. जुनागंज नांदेड यांना दिनांक 20/02/2024 रोजी ताब्यात घेतले. आणि त्यांचेकडे विचारपुस करुन सखोल चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे. भाग्यनगर, विमानतळ, शिवाजीनगर व नांदेड ग्रामीण या पो.स्टे. चे हादीत घरफोडीचे एकुण 17 गुन्हे केल्याची कबुल दिली. सदर गुन्हयातील चोरीचा माल आरोपी संजय दत्ता गुंडेवार याचे नंदीग्राम सोसायटी जवळील विश्वकर्मा कॉलनी नांदेड येथील त्याचे राहते किरायचे घरुन खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड,  अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड,खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि  दतात्रय काळे, पोलीस अमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, धम्मा जाधव, महेश बडगु, रंनधिरसिंह राजबंशी, गजानन बयनवाड, व चालक शेख कलीम, हनुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!