लाठ खु. येथे नार्बाड बॅंक व संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उस्माननगर, माणिक भिसे| राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) व संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेच्या माध्यमातून कंधार तालुक्यातील लाठ खु. येथे एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल प्रकल्प कार्यरत असून या प्रकल्पाच्या माध्यमातून दिनांक 30 ऑक्टोबर २०२३ रोजी महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य विमा योजनेतून मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मोफत तपासणी शिबिरात गावातील गरजू रुग्णांनी आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाठ खु. नगरीच्या सरपंच गंगाबाई कोडीबा पैलपार या होत्या .तर प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर भाऊराव इंगोले व बळीराजा पाणलोट विकास समितीचे अध्यक्ष संजय घोरबांड होते. रुग्णांची तपासणी करण्यासाठी व मार्गदर्शनासाठी आरोग्य तपासणी शिबिरास भगवती हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. भरत रायभोळे , शेख मोबीन ,मारोती पाटील ,आधार हाॅस्पीटल नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सन्ना तसलिन , डॉ. संध्या मदनुरवाले ,डॉ. साहेल अंजुम , सिमा शिंदे, संजय पाठक श्री सिध्दिविनायक हॉस्पिटल येथील डॉ. पुजा लोखंडे, राजेश्री राठोड,सुयश मारुडवाड,व गोविंद पांडागळे यांची उपस्थिती होती. या प्रसंगी तानाजी पा.मोरे, शंकर गिरी, विनायक पा. इंगोले, नंदकिशोर इंगोले, रणजित पा. घोरबांड, शिवाजी पा. इंगोले, रावजी पा. इंगोले, संतोष पा. गवारे, विष्णू पा.इंगोले रामकिशन पा. घोरबांड,विठ्ठल कौऊटकर व उपसरपंच मनोज शिरसे ,आदी उपस्थित होते.
या शिबिरात गावातील सुमारे 300 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य शिबिरात स्त्रियांच्या आजारांवरील तपासणी, ECG व शरीरातील ऑक्सिजन तपासणी तसेच शरीरातील हांडाची तपासणी,आदी शरीराच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या. पात्र रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.भगवती हॉस्पिटल, आधार हाॅस्पीटल व श्रीसिध्दिविनायक हॉस्पिटल नांदेड येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या पथकाने रुग्णांची तपासणी केली. संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. तर निवृत्ती जोगपेटे यांनी सुत्रसंचालन केले. आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी
प्रदीप भिसे , सय्यद ईरशाद , अविनाश जोगी, व चंद्रकांत बाबळे यांच्या सह आदींनी परिश्रम घेतले . ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालय लाठ खु. यांनी सहकार्य केले..