नवीन नांदेड। लातूर लोकसभा मतदार संघातील निवडणूकीसाठी ७ मे रोजी तिसरा टप्पायासाठी मतदान केंद्रावर सकाळ पासूनच रांगा लागल्या होत्या, यावेळी जेष्ठ नागरिक, महिला, पुरुष, युवक,व नवमतदार यांच्या मोठ्या संख्येने समावेश होता, यावेळी मतदान केंद्राबाहेर सोनखेड पोलीस स्टेशनने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
लातूर लोकसभा मतदार संघातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणूकी साठी लोहा तालुक्यातील किवळा येथे जिल्हा परिषद शाळेच्या ४ केंद्रावर एकुण मतदार ३०३८ पैकी १९२२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला जवळपास ६३.४३ टक्के तर ढाकणी येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका मतदान केंद्रावर १३७५ पैकी ९४७ मतदारांनी हक्क बजावला येथे ६७ टक्के मतदान झाले ,तर टाकळगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका मतदान केंद्रावर ११३३ पैकी ८३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या ठिकाणी ७१ टक्के मतदान झाले, तर बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या २ मतदान केंद्रावर १४०७ पैकी १०६५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी ७२ टक्के मतदान झाले असल्याचे विश्वसनीय वृत आहे.
सकाळच्या सत्रात गावातील महिला,युवक,पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सोनखेड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या या गावात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण माने यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर मतदान केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या वतीने उपचारासाठी महिला कर्मचारी प्रत्येक केंद्रांवर नियुक्ती करण्यात आली होती, या वेळी निवडणूक आयोगाच्या पथकाने व वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी भेट दिली आहे.
गावातील मतदान करून घेण्यासाठी सरपंच,उप सरपंच,चेअरमन, ऊप चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह गावातील विविध राजकीय पक्षाचे सदस्य मतदान करून घेण्यासाठी सरसावले होते, यावेळी तंटामुक्त अध्यक्ष,पोलीस पाटील यांच्या सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. अत्यंत ऊत्साहात मतदान झाले तर दुपारी उन्हाळ्या मुळे कमी जास्त प्रमाणात तर सायंकाळी पाच नंतर पुन्हा गर्दी मतदान केंद्रावर पहावयास मिळाली,निवडणूक निमित्ताने भाजपा नेत्या तथा माजी जिल्हा परिषद सदस्या प्रणिताताई देवरे यांनी वरील गावात भेट देऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांचाशी संवाद साधुन मतदानाचा आढावा घेतला.