धनगरवाडी येथील बालाकाश्रम येथील 14 वर्षीय बालकाचे अपहरण,शोध पत्रिका जारी,गुन्हा दाखल

नवीन नांदेड l लहुजी साळवे बालकाश्रम धनगरवाडी रोड, साई बाबानगर वाड़ी पाटी नांदेड येथून १२ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास देव विश्वास दिपांकर बिश्वास वय 14 वर्ष रा. शवराबारी जि, गोपालगंज देश बांग्लादेश, हा खेळत असतांना बालाकाश्रम धनगरवाडी हा सुरक्षा रक्षक नजर चुकवून बाहेर गेला तो परत आलाच नाही यावरून त्यांच्ये कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी त्याचे अपहरण केले असून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला शोध पत्रिका जारी करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहिती पत्रकानुसार फिर्यादी ज्ञानेश्वर नामदेव भांडवले वय 26 वर्ष व्यवसाय लहुजी साळवे निराधार निराश्रीत बालाकाश्रम धनगरवाडी रोड, साई बाबानगर वाडी पाटी नांदेड ता.जि. नांदेड चे अधीक्षक्षक यांनी दिनांक 12 जुलै 24 रोजी सायंकाळी 05.वा. च्या सुमारास लहुजी साळवे निराधार निराश्रीत बालाकाश्रम धनगरवाडी रोड, साई बाबानगर वाडी पाटी नांदेड येथे मी ऑफीसमध्ये असताना कंपाऊंडमध्ये काही मुले खेळत होती व कंपाऊंड गेटजवळ सुरक्षा रक्षक भुजंग ज्ञानोबा नामपल्ले हा खुची टाकुन बसला होता, त्यातील एक मुलगा नामे देव विश्वास दिपांकर विश्वास चय 14 वर्ष रा. शबराबारी जि. गोपालगंज देश वांगलादेश हा खेळत असताना गेट जवळील सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून तो आश्रमाच्या बाहेर गेला तो परत आलाय नाही.
यावरुन त्याचे कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे. वगैरे फिर्याद वरुन पो.स्टे. नांदेड ग्रामीण येथे गु.र.न. ५९३/२०२४ कलम १३७ (२) बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास करीत आसुन सदर मुलाचे वर्णन खालील प्रमाणे आहे मुलाचे नाव देव विश्वास दिपांकर बिश्वास वय 14 वर्ष रा. शवराबारी जि. गोपालगंज देश बांग्लादेश ,उंची – अंदाजे ५फूट रंग- गोरा बांधा- मजबुत पोशाख- निळा शर्ट काळी पँट केस काळे चेहरां- गोल भाषा- हिंदी व बंगाली येत आहे.
तरी वरील नमुद अपहत मुलाचा शोध होवुन काही उपयुक्त माहीती मिळुन आल्यास कळविण्याचे आवाहन पो.स्टे. नांदेड ग्रामीण फोन न. ०२४६२,२२६३७३,तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर मटवाड यांनी केले आहे.
