नांदेडराजकिय

खा.चिखलीकर समर्थकाचे उस्माननगर ग्रामपंचायतवर वर्चस्व सरपंचपदी सौ.शोभाबाई काळम तर उपसरपंच म्हणून शेख बाशीदभाई

उस्माननगर| नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली , तर भाजपाचे खंदे समर्थक भाजपचे राष्ट्रीय सदस्य तथा माजी सरपंच तुकाराम वारकड गुरूजी , माधवराव भिसे ( माजी जिल्हा परिषद सदस्य प्र.) सुरेश मामा बास्टे ( भाजपा तालुकाउपाध्यक्ष) देवरावजी डांगे यांच्या पुढाकाराने उस्माननगर ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित करून सरपंच म्हणून सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांची दालनात उपस्थित सदस्यांनी हात उंचावून मतदान करून निवड करण्यात आली.

उस्माननगर येथील सरपंचांनी मागील काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता.या ठिकाणी सरपंच पद रिक्त होते.मा.तहसीलदार कंधार यांनी उस्माननगर ग्रामपंचायत येथील सरपंच पदासाठी निवडीची तारीख १४ डिसेंबर जाहिर करण्यात आली होती. उस्माननगर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीसाठी विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी व निवडणूक अधिकारी सि.एन.महाजन ( मंडळधिकारी तहसिलदार कार्यालय कंधार ) हे होते. सकाळी ११ वा. सौ.शोभाबाई शेषेराव काळम , यांनी व श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड यांनी ११.४६ वा. तर सौ. रेखाबाई गंगाधर भिसे यांनी ११.४७ वा. नामनिर्देशन पत्र सादर केले.

सरपंच पदासाठी एकुण तीन (३) नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते.नामनिर्देशन पत्राची ठिक दुपारी २ ते २:१५ वा. यावेळात छाननी करून सरपंच पदासाठी सौ.शोभाबाई काळम , श्रीमती गयाबाई घोरबांड,सौ.रेखा भिसे यांची नामनिर्देशन पत्र पात्र ठरविण्यात आले.त्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या अर्जापैकी श्रीमती गयाबाई शंकरराव घोरबांड यांनी आपले अर्ज वापस घेतले. त्यामुळे दोघी मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.ग्रामपंचयत उस्माननगर येथील सदस्य संख्या १५ आहे. यावेळी सर्व उपस्थित सदस्यांनी प्रोसिडींग दप्तर वर सह्या करून निवडणूकीचे कामकाज सुरू होण्यापूर्वीच रब्बाना काशीमशहा फकीर या ग्रा.पं.सदस्यानी सभागृह सोडले. येथील विशेष सभेचे कोरम पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचे अधिकारी सि.एन.महाजन यांनी सर्व सदस्यांना सरपंच निवडी विषयक बाबीची माहिती वाचन करून दाखविले.त्यामध्ये सरपंच पद हे सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे.उपस्थित सर्व सदस्यांनी सरपंच पदाची निवडणूक उघड मतदान( हात वर करून) घ्यावे , असे सर्वानुमते ठरविण्यात आले.

त्यानुसार सरपंच पदासाठी एकूण १४ उपस्थित सदस्यांपैकी सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांना आठ (८) मते मिळाली.तर सौ.रेखाबाई गंगाधर भिसे यांना केवळ सहा मते मिळाली.यावेळी निवडणूक अधिकारी महाजन यांनी सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांना उपस्थित सदस्य १४ पैकी ८ आठ मते मिळाली असल्यामुळे त्यांना सरपंच म्हणून निवडून आल्याचे घोषित केले. यांची निवड झाल्याबद्दल बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी निवडीच्या कामी सहकार्य केल्याबद्दल महाजन यांनी सर्वाचे आभार मानले.यावेळी के.के.हिंवत ( तलाठी सज्जा) शिंदे एस.एम.( मंडळधिकारी) सौ.शिंदे डि.( ग्रामविकास अधिकारी) यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या समर्थकांनी जोरदार फटाके वाजवून स्वागत केले. यावेळी सदस्य म्हणून शेख बाशिद भाई ,रूद्र (सजय) वारकड ,शिवशंकर काळे,सौ.लताबाई बा.घोरबांड , घोरबांड नारायण , शेख खाजीनी शौकत ,पिंजारी जुबेदाबाई म.शरीफ यांच्यासह सदस्यांचा सत्कार करण्यात आला. चौकट :- काॅग्रेस पुरस्कृत पॅनलचे आठ सदस्य असताना एक सदस्य पळविण्यात विरोधक यशस्वी झाल्याने भाजप समर्थंकाचे उस्माननगर ग्रामपंचायत वर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!