कै. शंककरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त गरजवंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाईपचे वाटप

नवीन नांदेडl भारताचे माजी गृहमंत्री कै.डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त अल्पभुधारक शेतकऱ्यांना वडगाव येथील समाधी स्थळी खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते पीव्हीसी पाईपचे वाटप आयोजक विनोद कांचनगिरे व संतोष कांचनगिरे यांच्या वतीने करण्यात आले.
जलनायक डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या जयंती निमित्त वडगाव येथील समाधी स्थळी अभिवादना नंतर आयोजक सामाजिक कार्यकर्ते विनोद कांचनगिरे,संतोष कांचनगिरे यांनी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पीव्हीसी पाईपचे वाटप खासदार तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमिताभामी चव्हाण,सुजया चव्हाण,श्रीजया चव्हाण यांच्या हस्ते अल्पभूधारक व गरजवंत शेतकरी नागोराव नरडेले , प्रकाश पवार, रंगराव पवार,निवघा, गजानन तिमेवार, अमोल माधवराव अबेगाव ,अमोल माधव नांदेडकर, साहेबराव बारशे बारसगाव,देविदास कांचनगिरे, धनंजय सावंत, रामाजी कोकरे, आदमापुर, गजानन तिमेवार, संतोष वरतले ,रूद्राजी गवळी बाबुराव टेळके यांना देण्यात आले. यावेळी ऊध्दवराव पवार, माजी नगरसेविका ललिता शिंदे, देविदास कांचनगिरे,विश्वनाथ शिंदे, आहतखान पठाण यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.
