हिमायतनगर, अनिल मादसवार| स्वार्थासाठी चुकीचा फेरफार करून हिमायतनगरच्या तलाठ्याने एक शेतकरी कुटुंबाचे जीवन उध्वस्त केले आहे. त्याच्यावर कायम बडतर्फ करण्याची कार्यवाही होण्याची मागणी शेतकऱ्याच्या पत्नीने केली आहे. मात्र त्या तलाठ्यास प्रशासनातील उपविभागीय अधिकारी पाठीशी घालून वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. हे निंदनीय असून, अश्या प्रकारे चुकीचे काम करणाऱ्याला पाठीशी घालून एक प्रकारे पुन्हा त्याला अशीच कामे करण्याची परवानगी दिली जाते कि काय..? असा माझा प्रश्न आहे. या संदर्भात मी येत्या सोमवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन शेतकरी नकुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते जाकेर चाऊस यांनी दिली.
हिमायतनगर येथील तलाठी पुणेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून जाणीवपूर्वक चुकीचा फेरफार करून शेतकऱ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरले आहेत. त्या तलाठ्याच्या विरोधात पीडित कुटुंबाने तक्रार देऊन त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून, कायम बडतर्फ करा अशी मागणी केली आहे. मात्र प्रशासनाने केवळ बदली करून पुन्हा समबंधित तलाठ्यास व यातील अन्य लोकांना अभय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संबंधित तलाठ्याच्या जाहीर सत्काराची छापलेली पत्रिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या गांधीगिरीच्या आंदोलनातून न्यायाची मागणी करण्यावर ठाम आहोत. असे सांगत आज शनिवारी तक्रारकर्ते विशाल जाधव यांनी हिमायतनगर येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्ते जाकेर चाऊस याना ती निमंत्रण पत्रिका दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जाकेर चाऊस हे पत्रकारांशी बोलत होते.
हिमायतनगर येथील तलाठी दत्तात्रय शाहूराव पुणेकर यांनी मयत परमेश्वर जाधव या गरीब शेतकरी कुटुंबावर अन्याय केला आहे. त्यांच्या नावाची शेती परसपर काही लोकांच्या नावाने स्वतःच्या स्वार्थाष्टही बेकायदेशीर असताना केल्यामुळे शेतकऱ्याने विषारी औषध प्रश्न करून आत्महत्या केल्याने जाधव कुटुंब उघड्यावर पडले आहे. त्या शेतकरी कुटुंबाला न्याय मिळून देण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी या कुटुंबाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे टाकणार आहे. पदाचा गैरवापर करून शेतकरी कुटुंबाला निराधार करणाऱ्या शासकीय अधिकारी व यात सामील असलेल्या व त्यांना पास्थीशी घालणाऱ्या सर्वाना कायद्याची वचक माहित झाली पाहिजे या मागणीसाठी मयताच्या भावाने त्या बेईमान स्वार्थी तलाठ्याला कायम बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्याने चक्क सत्काराची पत्रिका छापली असून, आज मलाही त्यांनी आमंत्रण देऊन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे.
यावेळी जाधव यांनी गतवर्षीपासून आत्तापर्यंत घडलेली सर्व हक्कीत मला सांगितली असून, तसे सर्व पुरावे, कागदपत्रेही दिली आहेत. सोमवारी नांदेड येथे गेल्यावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे भेट घेऊन संबंधित तलाठ्याला कायमस्वरूपी बडतर्फ करण्यासाठी मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते जाकेर चाऊस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पीडित कुटुंबाचे सदस्य विशाल जाधव, जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, असद मौलाना, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने, अनिल मादसवार, संजय मुनेश्वर, सोपान बोम्पीलवार, मनोज पाटील, दिलीप शिंदे, धम्मा मुनेश्वर, मिरझा नूहीबेगआदींसह अनेकांची उपस्थिती होती.
जोपर्यंत त्या तलाठ्याला कायम बडतर्फ केले जात नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार – जाधव
माझ्या भावाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या त्या तलाठ्याला कायम बडतर्फ करून घरी बसविले जात नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे. कारण त्याच्या चुकीमुळे माझे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. माझ्या भावाची लहान मुले पोरकी झाली आहेत, त्यांच्या पत्नीच्या जीवनाचे वाट्टोळे झाले आहे. त्यामुळे मी संनदशीर मार्गाने न्याय मागत आहे, जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. मला यासाठी खूप दबाव व अमिश दाखविले जात आहेत, मला माझ्या भावापेक्षा दुसरा काहीही पाहिजे नाही, एक तर त्यांनी माझा भाऊ परत आणून द्यावा नाहीतर त्या तलाठ्यासह यासाठी ज्यांचे ज्यांचे हात मिसळले त्यांना कायम बडतर्फ करून घरी बसवावे. नांदेड व हिमायतनगर येथील सर्व पत्रकारांनी माझ्या परिवारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले त्या सर्वांचा मी ऋणी आहे, माझ्या लढ्याला सर्वानी असाच पाठिंबा देऊन न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षाही जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.