नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नऊ वर्षाच्या सरकारने जी कामे केली आहेत तीच कामे खऱ्या अर्थाने विकासाचा भक्कम पाया ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळेच भारत जगातील महासत्ताक राष्ट्र म्हणून उभे राहते आहे आणि ही प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची, गर्वाची बाब असल्याचे मत खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केले . केंद्र सरकारच्या नऊ वर्षेपूर्ती नंतर ‘ आपला संकल्प विकसित ‘ यात्रा सुरू करण्यात आली. आज या यात्रेचा नांदेड जिल्ह्यातील शुभारंभ बोरगाव तेलंग येथे खा. चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने 9 वर्षाच्या विकासकालीन काळामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयांसह समाजातील शेवटच्या व्यक्तीसाठी अनेक योजना राबविल्या . याच अनुषंगाने ‘आपला संकल्प विकसित’ यात्रेचा नांदेड तालुक्यातील बोरगाव (ते.) येथे आज खा. चिखलीकर हस्ते शुभारंभ करण्यात आला. मोदी सरकारच्यावतीने गेल्या 9 वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा देणारी ही यात्रा संपूर्ण नांदेड जिल्ह्यात फिरत आहे. आज बोरगाव (ते.) येथे ही यात्रा पोहोचली असून, यावेळी सर्व लाभार्थ्यांशी खा. चिखलीकर यांनी संवाद साधला. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा , विधानसभा निवडणुकीतही आपण भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ज्यामुळे भारतात शाश्र्वत विकास साधता येईल असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ.प्रणिताताई देवरे-चिखलीकर, नांदेड उत्तर विधानसभा प्रमुख मिलिंद देशमुख, माजी जिल्हा उपाध्यक्ष राजा खंडेराय देशमुख, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल पाटील बोरगावकर, जिल्हा सरचिटणीस विजय गंभीरे, महानगर सरचिटणीस साहेबराव गायकवाड, नांदेड उत्तर मंडळ अध्यक्ष संतोष क्षीरसागर, बोरगावच्या सरपंच सौ.स्वातीताई अनिल क्षीरसागर, आशिष नेरळकर, सुनील राणे, संदीप पावडे, उपसरपंच केशवराव क्षीरसागर, पो.पा.अनंतराव क्षीरसागर, तिरुपती क्षीरसागर, बाबाराव बोकारे, सतीश क्षीरसागर, गोपाळ क्षीरसागर, बिडीओ, विस्तार अधिकारी ग्रामसेवक यांच्यासह आदी उपस्थित होते.