करियरनांदेड

नवीन अभ्यासक्रम व तुकडी वाढीसाठी इच्छूक संस्थानी 22 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

नांदेड| महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे मार्फत राबविण्यात येणारे अभ्यासक्रम चालविण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी मंडळाचे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक पंजीकृत संस्थाकडून /व्यवस्थापनाकडून तसेच यापूर्वी मान्यता दिलेल्या संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. याबाबतची जाहिरात www.msbsvet.edu.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

प्रवेश सत्र 2024-25 पासून मंडळाचे अभ्यासक्रम राबविणाऱ्या नवीन संस्थाना व अस्तित्वात असलेल्या संस्थामध्ये नवीन अभ्यासक्रम/तुकडीवाढ सुरु करण्यास मान्यता घेण्यासाठी इच्छूक संस्थानी मंडळाचे संकेतस्थळावर ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत. तसेच जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी नांदेड यांचेकडे प्रस्तावाच्या 4 नस्ती 22 फेब्रुवारी 2024 पर्यत सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर बी गणबीर यांनी केले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!