श्रीक्षेत्र माहूर, इलियास बावानी| वनपरीक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांनी ते रुजु झाल्या पासुन आज पर्यंत शेततळे, रोप वाटीका, रोप लावणे, रोहयो व विविध कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे. वझरा शे.फ. येथील रोपे न लावता फेकुन देणे सीमा पिलर उभारणी यासह इतर कामात प्रचंड भ्रष्टाचार केल्याने सामाजिक कार्यकर्ते तथा वन मित्र बंडूभाऊ राठोड यांनी संबंधितांना निवेदन देऊन भ्रष्ट कारभाराची चौकशी न झाल्यास दि 1.10.2025 रोजी पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा तहसीलदार अभिजीत जगताप यांचे सह वन विभागाच्या वरिष्ठांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

त्यांनी निवेदनात नमूद केले की. मी व माझ्या सहकार्यांनी वन विभागाच्या वरिष्ठांना वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव यांचा चार वर्षातील कारभाराचा भ्रष्टाचार निदर्शनास आनुन दिला. सष्टेंबर पर्यंत रोप न लावणे व वर्तमान पत्रात बातम्या येताच रोपे जंगलात नेवुन लावण्याचा आटापिटा कराणे ही शासनाची फसवणुक व शासकीय निधीचा अपहार आहे.

जुलै ऎवजी सप्टेंबर मध्ये हा प्रश्न उचलल्याने झाडे लावण्याचा केविलवाना भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केला आहे. परंतु खड्डे न करता झाडे लावल्याचा देखावा केला. एकही झाड त्या माळरानावर जगले नाही जगनारही नाही. आज पर्यंत आपण सदर प्रकरणी कोणतीही कार्यवाही केली नाही. म्हणुन खालील मागण्यासाठी जर दि.३०/०९/२०२५ रोजी पर्यंत कार्यवाही झाली नाही तर मी दि.०१/१०/२०२५ रोजी बुधवार ला आपल्या तहसिल कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार आहे.

वनपरीक्षेत्र अधिकारी रोहीत जाधव हे रुजु झाल्यापासुन १० सप्टेंबर २०२५ पर्यंत त्यांच्या कार्यकाळात मंजूर कामे किती व कोणती झाली त्यांची लेखी माहिती व जायमोक्यावर जावुन ती कामे झालीत का याची चौकशी करा.सर्व शेततळे रोपवन रोपवाटीका. व रोहयो ची कामे न करता निधी हडप केल्या प्रकरणी कार्यवाही करा.
मौजे शेख फरिद वझरा येथील झाडे न लावता फेकुण दिली व मी या प्रकरणी वर्तमान पत्रातुन माहिती दिली व आपणास दि.०२/०९/२०२५ रोजी निवेदन दिले.मागण्या व भ्रष्टाचार मी उघडकिस आणल्याने माझ्या विरुध्द खंडणी मागल्याची खोटी तक्रार देतो अशी धमकी सुध्दा मला दिल्याचे माझ्या मित्राकडून मला कळाले आहे त्यामुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची चौकशी करून कार्यवाही करावी अन्यथा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी दिल्याने खळबळ उडाली आहे.
